25 April 2019

News Flash

चिमुकल्यांचे प्रसंगावधान! १० आणि ७ वर्षांच्या भावांनी वाचवले आजीचे प्राण

त्यांची आई नर्स असल्याने तिने त्यांना ५ महिन्यांपूर्वीच cardio pulmonary resuscitation ही पद्धत शिकवून ठेवली होती

आजी आणि नातवंडांचे नाते हे शब्दात वर्णन करता येण्यापलिकडचे आहे. मनाच्या कोपऱ्यातली हळवी जागा असणाऱ्या या आजीला चिमुकल्या नातवंडांच्या प्रसंगावधानतेमुळे आयुष्य मिळाले आहे. हार्टअॅटॅक म्हणजे काय हे कळण्याचेही वय नसलेल्या वयात दोन भावंडांनी आश्चर्य वाटेल अशी कामगिरी केली आहे. आजीला हार्टअॅटॅक येत असताना cardio pulmonary resuscitation (CPR) द्वारे या दोघांनी तिचे प्राण वाचवले. CPR म्हणजे हृदयविकाराचा झटका आल्यावर करायचे काही प्राथमिक उपाय. यामुळे रक्ताभिसरण आणि श्वसन नियमित होऊन पुढील मदत मिळेपर्यंत ती व्यक्ती जिवंत राहण्याची शक्यता वाढते.

ही घटना कॅनडामध्ये घडली असून १० वर्षांचा कियान आणि ७ वर्षांचा ग्रेसन वू या चिमुकल्यांनी ही कमाल केली आहे. आपल्या ६२ वर्षाच्या आजीला हृदयरोगाचा त्रास आहे याची या दोघांनाही कल्पना नव्हती. पण त्यांची आई नर्स असल्याने तिने त्यांना ५ महिन्यांपूर्वीच cardio pulmonary resuscitation ही पद्धत शिकवून ठेवली होती. पण आपण शिकवलेली ही गोष्ट मुलांना इतक्या लगेच कामी येईल असे तिलाही वाटले नव्हते. मात्र त्यामुळे हे चिमुकले आजीचा जीव वाचवू शकले. आजीला cardio pulmonary resuscitation देत असतानाच या दोघांनी अॅम्ब्युलन्स बोलावली आणि ती येईपर्यंत ते तिच्यावर उपचार करत राहीले. सुदैवाने ही आजी वेळेत रुग्णालयात पोहोचल्याने तिचे प्राण वाचू शकले.

First Published on December 6, 2018 5:45 pm

Web Title: brothers aged 7 and 10 save grandmothers life from heart attack by performing cpr