आसियान समिटमध्ये भाग घेण्यासाठी जगातील सर्वात श्रीमंत म्हणून गणल्या जाणाऱ्या ब्रूनेईचे सुलतान हसनल बोल्कियाह हे बुधवारी भारतात आले. भारतातील दिल्ली विमानतळावर आगमन केल्यानंतर त्यांनी सर्व भारतीयांना एक आश्चर्याचा धक्काच दिला कारण त्यावेळी सुलतान स्वत: वैमानिकाच्या भूमिकेत होते. सुलतान हसनल सर्वाधिक श्रीमंत तर आहेच पण त्याचबरोबर इंग्लडची राणी एलिझाबेथ यांच्यानंतर सर्वाधिक काळ राजगादीवर असलेले ते दुसरे राजा आहेत. त्यांच्या स्वागतासाठी दिल्ली विमानतळावर अनेक मान्यवर उपस्थित होते. सुलतान हसनल यांचं आलिशान विमान विमानतळावर उतरल्यानंतर कॉकपिटमध्ये सुलतानाला विराजमान झालेलं पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

लांबलेल्या ‘पद्मावत’ वादावर क्रिएटीव्ह टोमणा; ‘ही’ जाहिरात झाली व्हायरल

२००८ आणि २०१२ मध्येही सुलतान भारतात आले होते, त्यावेळी देखील त्यांनी स्वत: विमान उडावलं असल्याचं ‘इकोनॉमिक्स टाइम्स’नं नमूद केलं आहे. विमान उड्डाणाबरोबरच गर्भश्रीमंत सुलतान हसनल यांना आलिशान गाड्यांचाही षौक आहे. त्यांच्याकडे जगातील सर्वात महागड्या अशा १०० हून अधिक गाड्यांचा ताफा आहे. त्यामुळे जगातील सर्वात महागड्या गाड्यांचा संग्रह असणाऱ्या व्यक्तींच्या यादीत हसनल यांचं नाव आघाडीवर आहे.  सुलतान हसनल हे ७१ वर्षांचे आहे. गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात त्यांनी आपल्या सत्तेची ५० वर्षे पूर्ण केली. २६ जानेवारीला होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमातदेखील ते सहभागी होणार आहेत.

आता पद्मावतच्या तिकिटांचे दर कमी करायला प्रेक्षकांना आंदोलन करावे लागेल; ट्विटरवर हास्यकल्लोळ