News Flash

VIDEO: ‘संदेसे आते है’ गाणाऱ्या BSF जवानाचे सोशल मिडियावर कौतुक

अरविंद केजरीवाल यांनीही या जवानाचा व्हिडीओ रिट्विट केला आहे

बीएसएफ जवान

सोशल मिडियावर मागील काही दिवसांपासून एका जवानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये सिमा सुरक्षा दलाचा (बीएसएफ) सुरेंद्र सिंग हा ‘बॉर्डर’ सिनेमातील  ‘संदेसे आते है हमे तडपाते है’ गाणे गाताना दिसतो. बीएसएफच्या कॅन्टीनमध्ये शूट करण्यात आलेल्या या व्हिडीओमधील सुरेंद्रवर सोशल मिडियावरुन कौतुकाचा वर्षाव होत आहे.

सुरेंद्रने मागील वर्षी झालेल्या ‘इंडियन आयडल’च्या १० व्या पर्वाचे ऑडिशनही दिले होते. त्यावेळीही त्याने हेच गाणे गायले होते. आता व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये सुरेंद्रचे सहकारी त्याच्या गायनाचा आनंद घेताना दिसत आहेत.

जाणून घेऊयात नेटकरी याबद्दल काय म्हणत आहेत

अंगावर काटा आला

तुम्हीच देशाचे खरे हिरो

भारतीय असल्याचा गर्व वाटतोय

खऱ्या भावना त्याने व्यक्त केल्या

ज्या नेटकऱ्यांना सुरेंद्रने इंडियन आयडॉलमध्ये ऑडिशन दिल्याचे कल्पना नाहीय त्यांनी त्याला ऑडिशन देण्याचा सल्ला दिला. विशेष म्हणजे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही या जवानाचा व्हिडीओ रिट्वीट केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 14, 2019 12:04 pm

Web Title: bsf jawan singing sandese aate hain gets applauded on social media
Next Stories
1 केरळमधील ७० वर्षीय चहाविक्रेते दाम्पत्य फिरले २० देश; आनंद महिंद्रांनी घेतली दखल
2 Video : जेव्हा जंगलाचे राजे प्रवाशांची वाट अडवतात
3 VIDEO : ८ वर्षाच्या चिमुरडीने राहुल गांधींना समजवला राफेल मुद्दा
Just Now!
X