केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मचा पहिला अर्थसंकल्प सकाळी ११ वाजता सादर करण्यास सुरूवात केली. या अर्थसंकल्पात काय काय तरतुदी असणार? शेतकऱ्यांसाठी काय घोषणा केल्या जाणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले असतानाच ट्विटवर मात्र अर्थसंकल्पासंदर्भातील मिम्स व्हायरल होताना पहायला मिळाले. अर्थसंकल्पात काय काय तरतुदी असणार? करदात्यांना काय काय सवलती दिल्या जाणार? याकडे सामान्यांचे लक्ष असतानाच त्यावरुन मिम्स व्हायरल होताना दिसत आहे.

सामान्यांसाठी बजेट म्हणजे

गुंतणूकदार

करदाते अर्थसंकल्प पाहताना

ट्विटवरचे एक्सपर्ट

आधी आणि नंतर

दरम्यान, अर्थसंकल्प सादर करणाऱ्या निर्मला सीतारमन पहिल्या महिला अर्थमंत्री ठरल्या आहेत. देशाच्या पहिल्या महिला अर्थमंत्री होण्याचा मान १९७०-७१ मध्ये इंदिरा गांधी यांच्याकडे गेला असला, तरी अर्थसंकल्प सादर करणाऱ्या निर्मला सीतारामन या पहिल्या महिला अर्थमंत्री ठरणार आहेत. कारण इंदिरा गांधी पूर्णवेळ अर्थमंत्री नव्हत्या. १९७०-७१मध्ये इंदिरा गांधी यांनी पंतप्रधान असताना अर्थ खातं त्यांच्याकडे ठेवलं होतं. मात्र सीतारामन या खऱ्या अर्थाने पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री ठरल्या आहेत. यापूर्वीही त्यांनी पहिल्या पूर्णवेळ महिला संरक्षणमंत्री म्हणून काम पाहिले आहे.