04 December 2020

News Flash

ग्राहकांनी सोशल डिस्टन्सिंग पाळावे म्हणून ‘बर्गर किंग’ची भन्नाट आयडीया

हा फोटो सध्या ठरत आहे चर्चेचा विषय

(Photo: Burger King Deutschland/ Facebook)

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जगभरातील अनेक देशामध्ये लॉकडाउन सुरु आहे. भारतामध्येही आता ३१ मेपर्यंतचा लॉकडाउन संपल्यानंतर पाचव्या लॉकडाउनच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. त्यामुळे २५ मार्चपासून सुरु असणारा लॉकडाउनचा कालावधी काही निवडक शहरांमध्ये वाढणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भारताबरोबरच इतर देशांनाही वेळोवेळी लॉकडाउनचा कालावधी वाढवत नागरिकांच्या सुरक्षेला प्रथम प्राधान्य दिलं आहे. मात्र असं असतानाच काही देशांमध्ये करोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर तेथील एक एक सेवा हळू हळू सुरु करण्यात आली आहे. अपेक्षेप्रमाणे करोनानंतरचे जग हे वेगळं असेल याची झलक येथे पहायला मिळत आहे. सर्वात मोठा बदल हा हॉटेल्स आणि खाद्यपदार्थांशी संबंधित क्षेत्रामध्ये झाला आहे. अनेक हॉटेल्सच्या रचनाबदलण्यापासून ते सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळण्यासाठी वेगवेगळ्या कल्पना अंमलात आणल्या जात आहेत. फास्ट फूड चैन असणाऱ्या बर्गर किंगनेही अशीच एक भन्नाट कल्पना अंमलात आणली असून सध्या ती चर्चेत आहे.

करोनाचा प्रादुर्भाव होऊ नये आणि लोकांनी एकमेकांपासून लांब उभे राहत सोशल डिस्टन्सिंग पाळावे म्हणून बर्गर किंगने अवाढव्य आकाराचे मुकुटं म्हणजेच क्राऊन बनवली आहेत. हे क्राऊन ग्राहकांना ऑर्डरबरोबर दिलं जातं. त्यामुळेच ऑर्डर घेतल्यानंतर ग्राहक एकमेकांपासून बरेच लांब उभं राहून बर्गरचा आनंद घेतात. या अवाढव्य क्राऊनचा फोटो जर्मनीमधील डॉइशलॅण्ड (Deutschland) येथील बर्गर किंगच्या फेसबुक पेजवरुन शेअऱ करण्यात आला आहे. “सोशल डिस्टन्सिंगही एखाद्या राज्याप्रमाणेच करा,” अशी कॅप्शन या फोटोला देण्यात आला आहे.

नक्की वाचा >> करोनंतरचं जग… हॉटेल आणि रेस्तराँमध्ये दिसणार ‘हे’ मुख्य बदल

इतकच नाही तर हे मुकूट घरी कसं बनवता येईल यासंदर्भाती एक पोस्टही कमेंटमध्ये बर्गर किंगकडून करण्यात आली आहे.

नक्की वाचा >>  भन्नाट… करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी करणार छत्र्यांचा वापर; संपूर्ण गावालाच छत्र्या वाटणार

ताईपाई, हाँगकाँग, कोरिया, चीनसारख्या देशामध्ये जिथे करोनानंतर हॉटेल पुन्हा सुरु झाली आहेत तेथेही अनेक बदल करण्यात आले असून सोशल डिस्टन्सींगबरोबरच अन्य नियम पाळण्यासाठी भन्नाट कल्पना लढवल्या जात आहेत. या देशांमधील बदललेल्या नियमासंदर्भातील हॉटेल्सचे फोटोही चांगलेच व्हायरल झाले होते. यापूर्वी इटलीमधील कॅफेनेही अशाच प्रकारे अगदी मोठ्या आकाराच्या छत्र्या वापरुन सोशल डिस्टन्सिंगचा अवलंब केल्याचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाले होते. भारतामध्येही केरळमधील एका गावामध्ये सोशल डिस्टन्सींगसाठी छत्र्यांचे वाटप करण्यात आलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 29, 2020 1:11 pm

Web Title: burger king is handing out giant crowns to ensure social distancing like a king scsg 91
Next Stories
1 बस, ट्रेन नाही तर थेट विमानाने १८० मजुरांना घरी आणलं, ‘या’ राज्यावर होतोय कौतुकाचा वर्षाव
2 डॉक्टर-नर्सचं हॉस्पिटलमध्येच ‘शुभमंगल सावधान’, फोटोंवर लाइक, कमेंटचा पाऊस
3 Viral Video: रोबो डॉग करतोय मेढ्यांची राखण; पाहणारेही झाले थक्क
Just Now!
X