शॉर्ट सर्किटमुळे जळालेला पक्षी शेतात पडला आणि यामुळे जवळपास १७ एकर परिसर जळून खाक झाला आहे. जर्मनीमध्ये हा विचित्र अपघात घडला आहे. वाऱ्यामुळे ही आग आजूबाजूच्या परिसरात पसरत गेली अखेर अग्निशमन दल आणि नंतर हेलिकॉप्टरच्या मदतीनं ही आग नियंत्रणात आणण्यात आली, मात्र तोपर्यंत बरंच नुकसान झालं होतं.

उत्तर जर्मनीत हा प्रकार घडला. विद्युत तारेच्या संपर्कात पक्षी आला आणि लगेच त्यानं पेट घेतला. जळत असतानाच तो शेतात पडलं. शेतात वाळलेलं गवत असल्यानं काही वेळातच गवतानं पेट घेतला आणि वाऱ्याच्या वेगानं ही आग अधिकच पसरत गेली. सुदैवानं या आगीत कोणत्याही प्रकारची जिवीतहानी झाली नाही. मात्र मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालं. आगीमुळे या परिसरात वाहतुकीसाठीही मोठा अडथळा येत होता. अशा प्रकारे पक्ष्यामुळे शेत जळून खाक झाल्याची ही पहिलीच घटना असेल.