भारतातील कोविड-१९ ची दुसरी लाट ओसरू लागली आहे. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या कमी होत आहे. २२ जून २०२१ पर्यंत भारतामध्ये करोना व्हायरसची एकूण ५३,२५६ एवढी नवीन रुग्णांची संख्या नोंदवली गेली आहे. यामुळे नियमही हळूहळू शिथिल करण्यात येत आहेत. परंतु तिसरी लाट येऊ नये म्हणून नागरिकांनी नियमांचे पालन सुरु ठेवायचेच आहे. कोविड १९ चे नियम पाळले जावेत यासाठी उद्योगपती हर्ष गोएंका यांनी एका भन्नाट कल्पनेचा व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती मशीन कुणीही कोविड-१९ चे नियम मोडणार नाही याची खात्री करते. गोएंका यांनी हा व्हिडिओ त्यांच्या ट्विटर हँडलवरून शेअर करत अशा मशीन प्रत्येक क्रॉसिंगवर इन्स्टॉल करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

कसं काम करतं हे मशीन?

११ सेकंदाच्या या व्हायरल व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की जो नियमांचं पालन करत मास्क घालून आलेला आहे त्याला मशिनकडून अटकाव केला जात नाहीये. तर कोणी विना मास्क येत असेल तर त्याला मात्र मास्क घातल्याशिवाय हे मशीन पुढे जाऊ देत नाहीये. आतापर्यंत १९ हजाराहून अधिक नेटिझन्सनी हा व्हिडीओ पाहात आणि काहींनी रीपोस्ट करत या भन्नाट कल्पनेच्या व्हिडीओला लाईक केलं आहे.

 

व्हायरल व्हिडीओवर भन्नाट कमेंट्सचा पाऊस!

या व्हिडिओ खालच्या कमेंट्समध्ये काहींनी ‘भारतात अशा मशीन प्रत्येक प्रवेशद्वारावर लावायला पाहिजेत’ असं म्हटलं तर काहींनी ‘राजकीय रॅलीच्या दरम्यानही अशा मशीन वापरल्या पाहिजेत’, ‘खासकरून या मशीन संसदेत लावल्या पाहिजेत’ अशी कमेंट केली. परंतु अनेक नेटकऱ्यांच्या मते ‘हे मशीन भारतात टिकणार नाही’, ‘मशीन थकून जाईल पण लोक मास्क घालणार नाहीत’, ‘ही जास्त कठोर शिक्षा आहे’ अशी मतंही कमेंट्सच्या माध्यमातून व्यक्त केली. काही क्रिएटिव्ह नेटिझन्सनी सिनेमातल्या मजेशीर सीनच्या आणि डॉयलॉग मदतीने जीफ्स बनवून त्या माध्यमातूनसुद्धा टिप्पणी करत व्हिडीओला पसंती दर्शवली आहे.