देशातील अग्रगण्य कंपन्यांमधील एक मॉन्‍डेलीज इंडियानं लॉकडाउन आणि करोना व्हायरसच्या संकटकाळात सर्वांची सेवा करणाऱ्या करोना योद्धांचा अनोख्या पद्धतीनं सन्मान केला आहे. त्यांनी अनेक वर्षांच्या कालावधीत पहिल्यांदाच आपल्या कॅडबरी या लोगोच्या जागी ‘थँक यू’ असं छापून करोनाचा सामना करणाऱ्या योद्घांचा गौरव करण्याचा प्रयत्न केला आहे. कंपनीनं लिमिटेड एडिशन कॅडबरी बाजारात आणल्या आहेत.
भारतात कॅडबरीचं चॉकलेट जवळपास ७० वर्षांपूर्वी लाँच झालं होतं. तेव्हापासून आजवरच्या कालावधीत पहिल्यांदाच कंपनीनं आपल्या लोगोच्या जागी ‘थँक यू’ असा शब्द छापला आहे. “ज्या व्यक्ती या कठीण काळात न थकता लोकांची सेवा करत आहे, अशा प्रत्येकाला कॅडबरी धन्यवाद देईल. ते योद्धे आपलं काम अशाच पद्धतीनं सुरू ठेवतील. तसंच ‘थँक यू’ लिहिलेल्या चॉकलेटच्या विक्रीतून जी रक्कम जमा होईल त्यातील काही भाग असंघटीत क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना मदत करणारे एनजीओ आणि रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांच्या आरोग्य विमा योजनेसाठी देण्यात येणार आहे,” अशी माहिती मॉन्‍डेलीज इंडियाकडून देण्यात आली.

“ब्रॅन्ड म्हणून कॅडबरी डेअरी मिल्कचा असा विश्वास आहे की उदारता यासारख्या कठीण काळात आशा देऊ शकते. कॅडबरी हा देशातील सर्वात विश्वसनीय ब्रॅन्ड म्हणून ओळखला जातो. प्रत्येकाच्या आयुष्यात कॅडबरी डेअरी मिल्कचं एक वेगळंच महत्त्व आहे. त्यामुळे आम्ही देशवासीयांच्या भावना भावना व्यक्त करणारं पॅक तयार केलं,” अशी माहिती मॉन्‍डेलीज इंडिया में मार्केटिंग (चॉकलेट्स) विभागाचे अध्यक्ष अनिल विश्वनाथन यांनी सांगितलं. “हा सद्य परिस्थितीत झटणाऱ्या योद्धांचा सन्मान करण्याचा छोटासा प्रयत्न आहे,” असंही ते म्हणाले.

आठ भाषांमध्ये होणार छपाई

कॅडबरी डेअरी मिल्क ‘थँक यू’ हे आपल्या रॅपर्सवर आठ भाषांमध्ये छापणार आहे. यामध्ये इंग्रजी, मराठी / हिंदी, गुजराती, बंगाली, तमिळ, तेलुगु, कन्नड आणि मल्याळम या भाषांचा समावेश आहे,