वाघ जंगलात असो किंवा पिंजऱ्यात शेवटी वाघ तो वाघच. त्याच्या तावडीत एखादा सापडला तर त्यावर झडप घालण्यावाचून तो काही शांत बसणार नाही. याचा प्रत्यय चीनमध्ये राहणाऱ्या ६८ वर्षीय वृद्धाला पुरेपुर आला. सर्कशीतल्या वाघाच्या पिंजऱ्यात त्यानं हात घातला. वाघांना काहीतरी भरवण्याचं निमित्त करून त्यानं आपला हात वाघाच्या तोंडाजवळ नेला. हा सर्कशीतला वाघ असल्यानं आपल्याला काही करणार नाही असंच बहुधा या वृद्धाला वाटलं असेल.

अॅपलच्या ‘प्रामाणिक’ ग्राहकांना सॅमसंगची भन्नाट ऑफर

पण, त्याचा अतिआत्मविश्वास त्याच्याच अंगाशी आला आणि वाघानं काही कळायच्या आतच त्याच्या हात आपल्या जबड्यात घट्ट पकडून ठेवला. काही केल्या वाघ या वृद्धाचा हात सोडायला तयार नव्हता. शेवटी लोकांनी या वाघावर काठीनं हल्ला करत त्याच्या जबड्यातून या वृद्ध माणसाचा हात बाहेर काढला. या माणसानं वाघाच्या हल्ल्यात आपली बोटं गमावली.

Video : म्हणून पोलीस स्टेशनमध्येच उडवला लग्नाचा बार

एका वृत्तपत्राच्या माहितीनुसार हा व्यक्ती सुरक्षारक्षकांची दिशाभुल करून वाघांच्या पिंजऱ्याशेजारी पोहोचला होता. सर्कस सुरू होण्याआधी वाघांना एका ठिकाणी ठेवण्यात आलं होतं, त्यांना जवळून पाहण्यासाठी हा वृद्ध गेला होता. पण, असं करणं त्याला चांगलंच महागात पडलं.