काही मिनिटांचा उशीर झाला तर काय फरक पडतोय? असं कधीतरी आपण सहज म्हणून जातो. पण काही मिनिटांचा फरक पडला तर काय घडू शकतं याचं भन्नाट उदाहरण म्हणजे फोटोत दिसणारी जुळी मुलं. १८ मिनिटांच्या फरकांनी या दोघांचा जन्म झाला. पण, या फरकामुळे एकाचा जन्म झाला २०१७ मध्ये तर दुसऱ्या बाळाचा जन्म झाला २०१८ मध्ये.

ऐकावे ते नवलच! २०१८ मध्ये निघालेले विमान २०१७ ला पोहोचले

सेल्फीसाठी आईपासून विलग केलेल्या हत्तीच्या पिल्लाचा २४ तासांत मृत्यू

कॅलिफोर्नियामधल्या डिलानो रिजनल मेडिकल सेंटरमध्ये या जुळ्यांचा जन्म झाला. मारिया असं त्यांच्या आईचं नाव आहे. ३१ डिसेंबरला मारियानं मुलाला जन्म दिला. ११ वाजून ५८ मिनिटांनी तिने मुलाला जन्म दिला. त्यानंतर १८ मिनिटांच्या फरकानं तिनं गोंडस मुलीला जन्म दिला. त्यामुळे ही मुलं जुळी असली तरी भिन्न वर्षांत त्यांचा जन्म झाला. या दुर्मिळ योगामुळे ही जुळी भावंड सगळ्यांच्या चर्चेचा विषय ठरली आहेत.