बिबट्यांबद्दलच्या बातम्या सतत वर्तमानपत्रामधून वाचनात येत असतात. अस असतानचा सोशल नेटवर्किंगवर मात्र सध्या एका बिबट्याची वेगळ्याच कारणासाठी चर्चा सुरु आहे. खरं म्हणजे नेटकरी या चर्चेत असणाऱ्या बिबट्याचा शोध घेत आहेत. एका ट्विटर युझरने ट्विट केलेल्या फोटोमध्ये नेटकरी बिबट्या शोधण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.

पिवळ्या आणि काळ्या रंगाचा बिबट्या या फोटोमध्ये पाहता क्षणी सापडणे खूपच कठीण आहे. अनेकांनी हा बिबट्या शोधण्याचा प्रयत्न केला आहे. ‘मला एका व्यक्तीने हा फोटो पाठवला आणि यामध्ये बिबट्या शोधून दाखवण्यास सांगितले. मला आधी हा विनोद वाटला. मात्र नंतर खरोखरच मला या फोटोत बिबट्या दिसला. तुम्हाला सापडतोय का बिबट्या पाहा बरं,’ असं हा फोटो ट्विट करणाऱ्या युझरने म्हटले आहे. हा फोटो अडीच हजारहून जास्त जणांनी रिट्विट केला आहे. तर चार हजारहून अधिक जणांनी कमेंट करुन बिबट्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र अनेकांना हा बिबट्या सापडलेला नाही. तुम्हाला सापडतोय का पाहा.

काय म्हणताय नाही सापडत? थोडा प्रयत्न करा की? तुमच्यासारखी अनेकांनी हार मानली आहे

१)

२)

३)

४)

५)

६)

चला नाही सापडत आम्हीच सांगतो मग उत्तर… तर इथे आहे बिबट्या…

Leopard Perfectly Camouflaged Picture

अशाच प्रकारे बिबट्याचा एक बर्फामधील फोटो मे महिन्यामध्येही व्हायरल झाला होता.