News Flash

फोटोत लपलेल्या ‘या’ पालीला तुम्ही शोधू शकता का?

शोधा कुठे लपली आहे 'ही' पाल

सोशल मीडियावर अनेक वेळा असे काही फोटो व्हायरल होत असतात जे पाहून अनेकदा आपण गोंधळात पडतो. यात कोडं सोडवा या प्रकारातीलही काही फोटो असतात. सध्या असाच एक फोटो सोशल मीडियावर भन्नाट व्हायरल होत असून त्यात पाल शोधा असं सांगण्यात येत आहे. हा फोटो एका नेटकऱ्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

@Afro_Herper या नेटकऱ्याने ट्विटरवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये काही वाळलेली झाडं एकत्र पडली असून त्याच्या वाळलेल्या फांद्यावर एक पाल आहे. विशेष म्हणजे ही पाल हुबेहूब या वाळलेल्या फांद्यांच्या रंगाची आहे. त्यामुळे ती पटकन नजरेस येत नाही. म्हणूनच @Afro_Herper ने हा फोटो शेअर करत फोटोतील पाल ओळखा असं म्हटलं आहे.

“ट्री लीजर्ड सारख्या पाली या वातावरणाशी एकरुप होण्यात पटाईत असतात. मात्र तरीदेखील शिकारी त्यांना बरोबर भक्ष्य करतो. तसंच पाली या कायम फटी, भेगा किंवा झाडांवर असतात, कारण येथे त्या पटकन लपू शकतात. तुम्ही ही लपलेली पाल पाहू शकता”, असं कॅप्शन या फोटोला देण्यात आलं आहे.

दरम्यान, हा फोटो व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी त्यावर कमेंट केली असून शोधण्याचा खूप प्रयत्न केला असं सांगितलं आहे. त्यामुळे अखेर @Afro_Herper ने पुन्हा एक नवीन फोटो शेअर करत ही पाल नेमकी कुठे लपली आहे हे सांगितलं.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 8, 2020 1:27 pm

Web Title: can you spot lizard in this picture peoples confused photo is going viral ssj 93
Next Stories
1 इटलीमधील बर्फाचा रंग झाला गुलाबी तर अंटार्क्टिकात सापडला Green Ice; वैज्ञानिकही चक्रावले
2 तळण्यासाठी चूकून खाद्य तेलाऐवजी इंजिन ऑइल वापरलं; त्यानंतर असं काही झालं की…
3 धोनीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी हार्दिक पांड्या थेट रांचीला, व्हिडीओ व्हायरल
Just Now!
X