इंटरनेटवर अनेकदा भन्नाट गोष्टी व्हायरल होत असतात. यापैकी एक नेहमी व्हायरल होणारा विषय म्हणजे ऑप्टीकल इल्यूजन अर्थात दृष्टीभ्रम निर्माण करणारे फोटो. सध्या असाच एक फोटो इंटरनेटवर चर्चेत आहे. विशेष म्हणजे हा फोटो ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांनी पोस्ट केला आहे.

शबाना आझमी यांनी आज (१३ ऑक्टोबर २०२० रोजी) दुपारच्या सुमारास ट्विटरवरुन एक फोटो पोस्ट केलाय. या फोटोला त्यांनी कोणतीही कॅप्शन दिलेली नाही. या फोटोवर, ‘या फोटोत तुम्हाला काय दिसत आहे. तुमच्याकडे पाहणारा बोकड की दुसरीकडे पाहणारा पक्षी?’ असं वाक्य लिहिण्यात आलं आहे. सामान्यपणे या फोटोमध्ये पहिल्यांदा डावीकडे पाहणारा पक्षीच नजरेत भरतो. मात्र नीट निरखून पाहिल्यास उजवीकडे पाहणारा बोकडही या फोटोत दिसतो. तुम्ही पण बघा बरं एकदा तुम्हाला या फोटोत दिसतोय का बोकड…

What Sanjay Raut Said?
संजय राऊत नवनीत राणांबाबतच्या विधानावर ठाम! “नाचीला ‘नाची’ नाही तर मग…?”
How do you make sure there is no worm in a cauliflower
फक्त काही सेंकद फुलकोबी गॅसवर ठेवा, झटक्यात बाहेर येईल अळी किंवा किडे; पाहा भन्नाट Kitchen Jugaad
What Is Sugar Made Of Milk Honey Table Sugar
साखर हे पांढरं विष? दूध, मध, साध्या साखरेत नेमकं असतं काय? १० दिवस साखर खाल्ली नाही तर कसं बदलेल शरीर?
Kitchen jugad video wash clothes with green chilli apply on cloth
Kitchen Jugaad Video: साबणाऐवजी हिरव्या मिरचीने धुवा कपडे; विचित्र उपायाचा चमत्कारिक परिणाम

या ट्विटखाली डॉ. बकुळ देव नावाच्या ट्विटर युझरने हा फोटो ऑस्ट्रेलियात आढळून येणाऱ्या कुकाबुरा या पक्षाचा असल्याची माहिती दिली आहे. हा फोटो डेव्हिड हील यांनी काढला आहे, असंही देव यांनी म्हटलं आहे.

द सन या वृत्तपत्राने याच वर्षी जुलै महिन्यात दिलेल्या वृत्तानुसार हा फोटो न्यू साऊथ वेल्समधील जंगलांमध्ये काढण्यात आला आहे. ५९ वर्षीय डेव्हिड हे हौशी फोटोग्राफर असून त्यांना कुकाबुरा पक्षी दिसताच त्यांनी त्याचा फोटो काढला. नंतर हा फोटो आपल्या एका मित्राला दाखवताना त्याने या फोटोमध्ये नीट पाहिल्यास उजवीकडे मान वळवून पाहणारा बोकड दिसत असल्याचे डेव्हिड यांना सांगितले. त्यानंतर इंटरनेटवर हा फोटो प्रचंड व्हायरल झाला होता.

बरं काय म्हणताय तुम्हाला अजूनही सापडत नाहीय का या फोटोमध्ये लपलेला बोकड. तर मग एक काम करा पक्षाची चोच ही बोकडाचे शिंग आहे असा विचार करुन फोटोकडे पाहिल्यास बोकड दिसतो. अजून नाही दिसत आहे. बरं घ्या मग हा फोटो बघा…


दिसला की नाही बोकड?