भारतात चहा म्हणजे जणू अमृतच. दिवसाच्या कोणत्याही वेळेला चहा घेणारे चहाचे शौकीन अगदी ठिकठिकाणी पाहायला मिळतात. आता हा चहा केवळ भारतीयांनाच आवडतो असे नाही. तर अनेक परदेशी नागरिकही चहाचे मोठे फॅन आहेत. असेच चहाचे चाहते असलेल्या एका कॅनेडियन कपलने तर चहा आवडला म्हणून चहाचे दुकानच सुरु केले आहे, तेही कॅनडामध्ये. टोरांटोमध्ये त्यांनी चायवाला नावाने आपला चहाचा कॅफे सुरु केला आहे. त्यामुळे भारताचा चहा सातासमुद्रापार पोहोचला असे म्हणायला हरकत नाही.

garvit and nandini suicide instagram
‘लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या युट्यूबर जोडप्याची अवघ्या पंचवीशीतच आत्महत्या
Nigerian citizen, Arrested in Nalasopara, Drugs Worth 57 Lakhs, cocaine, mephedrone, drugs in nalasopara, crime in nalasopara, marathi news, crime news,
नालासोपार्‍यात ५७ लाखांचे अमली पदार्थ जप्त
tank bomb shell Hinjewadi
हिंजवडीत पुलाचे काम करताना रणगाड्याचे बॉम्बशेल सापडले
Hardik Malinga Pushing Video Viral
MI vs SRH : हार्दिक पंड्याने लसिथ मलिंगाला ढकलल्याने चाहते संतापले, VIDEO होतोय व्हायरल

आता तुम्हाला वाटेल यांना चहा आवडला म्हणजे नक्कीच त्यांनी भारतात चहा प्यायला असेल. पण तसे नसून या जोडप्याने सगळ्यात पहिल्यांदा ऑस्ट्रेलियामध्ये चहा प्यायला होता. इमोन आणि बेक्का हे दोघेही कामानिमित्त ऑस्ट्रेलियामध्ये होते. तिथे त्यांनी पहिल्यांदा चहाची चव घेतली. त्यानंतर त्यांनी आशियातील विविध देशांत फिरत असताना चहाची चव घेतली मात्र त्यांना भारतातील मसाला चहा जास्त आवडल्याने त्यांनी त्याचेच दुकान टाकायचे ठरवले. टोरांटोमध्ये दुकान टाकल्यानंतर त्यांचा हा चहा कॅनडातील लोकांना इतका आवडला की त्यांच्या दुकानासमोर अक्षरश: रांगा लागण्यास सुरुवात झाली. आता त्यांना काही कॅफेमधूनही चहाची ऑर्डर येते. याशिवाय त्यांच्या चहाच्या दुकानात चहाचे काही प्रकार आणि चहा आणि नाश्ता यांची विविध क़ॉम्बिनेशन्स उपलब्ध आहेत.