26 November 2020

News Flash

असा विचित्र अपघात तुम्हीही पाहिला नसेल, कार शिरली थेट दुसऱ्या मजल्यात

ऐकावे ते नवलच

एखाद्या कारचा अपघात झाला म्हणजे ती आदळून कुठेतरी आपटली किंवा खाली दरीत पडली यांसारख्या घटना आपण ऐकल्या असतील. पण कार उडून एखाद्या इमारतीत गेली तर? हो, ऐकायला काहीसे विचित्र वाटत असले तरी असे झाले आहे. कॅलिफोर्नियामध्ये एक अजब घटना घडली आणि अपघात झालेली कार थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या इमारतीत गेली. आश्चर्य म्हणजे ही कार इमारतीच्या पार्किंगमध्ये गेली नाही तर ती थेट इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर जाऊन अडकली. ही कार अडकली त्याठिकाणी एका दंतरोगतज्ज्ञाचा दवाखाना होता. या घटनेचे फोटो त्या ठिकाणच्या अग्निशमन दलाने घेतले असून ते सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, सकाळी ५.३० वाजता एक अपघात झाल्याचा फोन दलाकडे आला. अतिशय वेगात असलेली कार दुभाजकावर आदळली होती. वेगाने येत असलेली कार चालकाच्या चुकीमुळे दुभाजकावर आदळली. अपघात झाला त्यावेळी कारचा वेग इतका जास्त होता की त्यामुळे ती इमारतीत शिरली. अशाप्रकारे कार हवेत उडून वरच्या मजल्यावर आदळल्याने याठिकाणी आग लागल्याची माहितीही त्यांनी दिली. चालक योग्य पद्धतीने गाडी चालवत नसल्याने ही घटना घडली असल्याचे अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले.

या कारमध्ये २ जण होते, ते काही प्रमाणात जखमी झाले. त्यातील एकाला अपघात झाल्यानंतर काही वेळात कारच्या बाहेर पडण्यात यश आले. मात्र दुसरा व्यक्ती एक तासाहून जास्त वेळ कारमध्ये अडकून बसला होता. त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही कार इतक्या वाईट पद्धतीने इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर अडकली होती की ती काढण्यासाठी मोठ्या यंत्रांचा वापर करण्यात आला. त्यानंतर क्रेनच्या साह्याने कार खाली काढण्यास अग्निशमन दलाला यश आले. कार ज्याठिकाणी अडकली त्या दवाखान्याचेही या अपघातामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 15, 2018 12:28 pm

Web Title: car accident car got wedged in second floor of building california
Next Stories
1 ‘लग जा गले’, सतत मिठी मारणाऱ्या पंतप्रधान मोदींची काँग्रेसकडून खिल्ली
2 आज विकीपीडियाचा वाढदिवस: विकीपीडियावर वाढते मराठी…
3 Viral Video : दोनदा कारनं धडक दिल्यावरही ‘ती’ आश्चर्यकारकरित्या बचावली
Just Now!
X