सोशल मीडिया (Social Media) सध्या मांजरीचा एक भन्नाट आणि मजेशीर व्हिडीओ व्हायरल झाला आहे. तुम्हीही मांजराचे अनेक व्हिडीओ पाहिले असतील. कधी हसतखेळत एखाद्या मुलासोबत खेळताना तर कधी श्वानाला पळवून लावतानाचा व्हिडीओ तुम्ही पाहिला असेल. आता भक्तीभावात मग्न झालेल्या मांजरीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडीओत मांजरी बाप्पाची आरती एकूण टाळ्या वाजवत असल्याचं दिसतेय. सोशल मीडियावर हा व्हिडीओ आयएएस आधिकारी अवनीष शरण (IAS Officer Awanish Sharan) यांनी पोस्ट केला आहे. त्यांनी व्हिडीओ पोस्ट करताना कॅप्शनमध्ये लिहलेय की, ‘भक्ति भाव से सराबोर.’ सोशल मीडियावर (Social Media) हा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे.

२९ सेकंदाच्या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता…..बँकग्राउंडला बाप्पाची आरती सुरु आहे. त्या तालावर मांजरी टाळ्या वाजवत आहे. व्हिडीओत दिसत नाही पण काही लोकही टाळ्या वाजवत आहेत त्यांचा आवाज स्पष्ट ऐकू येत आहे. या लोकांना पाहूनच मांजरी टाळ्या वाजवत असू शकते. काही नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. मांजरी टाळ्या वाजवत असलेल्या व्हिडीओच्या बॅकग्राउंडला बाप्पाची आरती जोडल्याचा आरोप केला आहे.

३० सप्टेंबर रोजी अवनीष शरण यांनी हा व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट केला आहे. आतापर्यंत या व्हिडीओला ११ हजारपेक्षा जास्त जणांनी पाहिला आहे.