News Flash

Video: या मांजरींच्या कॅटवॉकसमोर मॉडेलसुद्धा पडतील फिक्या

हा व्हिडीओ पाहून 'बिल्लो रानी, कहो तो अभी जान दे दू' असे म्हणायला हरकत नाही

आपण अनेकदा बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेलना फॅशन शो दरम्यान रॅम्प वॉक करताना पाहिले आहे. या मॉडेल सुंदर, फॅशनेबल कपडे आणि त्यावर साजेसा मेकअप करुन रॅम्पवर चालताना दिसतात. यासाठी त्यांना अथक प्रयत्न आणि मेहनत घ्यावी लागते. रॅम्पवॉक म्हणायला जरी सोपं असलं तरी तसं चालताना भल्याभल्या मॉडेल्सचीही दमछाक होते. या विशिष्ट प्रकारच्या वॉकला मांजरींच्या चालण्याच्या पद्धतीवरून नाव पडलं आहे. पण तुम्ही मांजरींना कधी रॅम्पवर मॉडेल्सच्या थाटात चालताना पाहिलं आहे का? सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

एका देसी मोजिटो नावाच्या ट्विटर अकाऊंटवर मांजरींचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये मांजरींनी छानसे कपडे परिधान केले आहेत. एका मांजरीने तर साडी नेसल्याचे दिसत आहेत तर दुसरीने फ्रॉक घातला आहे. वेगवेगळ्या पोशाखांमधील या मांजरी खूप छान रॅम्प वॉक करत असल्याचे दिसत आहे. सगळ्याच मांजरी अतिशय सुंदर दिसत असून ‘बिल्लो रानी, कहो तो अभी जान दे दू’ असे म्हणायला हरकत नाही. त्यांचा हा वॉक पाहून अनेकांनी ‘Cat Walk’ असे म्हटले आहे.

हा व्हिडीओ शेअर करत ‘हा सर्वात क्यूट व्हिडीओ आहे, जो तुमच्यासाठी प्रदर्शित करत आहोत’ असे लिहिले होते. सध्या या मांजरींचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर अनेक ट्विटर यूजर्सने कमेंट केल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 16, 2019 4:55 pm

Web Title: cats are wearing nice dress and doing cat walk avb 95
Next Stories
1 हा आहे फोटोग्राफीसाठी सर्वोत्तम स्मार्टफोन?; आनंद महिंद्रांचे ट्विट व्हायरल
2 हे ठाऊक आहे? पंतप्रधान मोदींनी किशोरवयात नाटक लिहून त्यात केला होता अभिनय!
3 आनंद महिंद्रांनी ‘करुन दाखवलं’… यानंतर महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्राच्या बैठकीत दिसणार नाही ‘ही’ गोष्ट
Just Now!
X