News Flash

Viral Video : पोलिसांनी नाट्यमयरित्या तिला ट्रेनखाली येण्यापासून वाचवलं

काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ

रुळ ओलांडण्याच्या नादात ही महिला ट्रेनखाली येणार होती.

ट्रेन खाली येण्यापासून नाट्यमयरित्या बचावलेल्या एका महिलेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. काळजाचा ठोका चुकवणारा हा व्हिडिओ ऑस्ट्रेलियामधल्या एका स्टेशनवरचा आहे. ही महिला मद्यप्राशन करून रेल्वे रुळ ओलांडण्याचा प्रयत्न करत होती. पण नशेमुळे तिला स्वत:चा तोल सावरता येत नव्हता, ना तिला प्लॅटफॉर्मवर चढता येत होतं अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे.

Video : वाघाच्या जबड्यात हात घालणं पडलं महागात

रुळ ओलांडण्याच्या नादात ही महिला ट्रेनखाली येणार होती. वेगात येणाऱ्या ट्रेनची धडक तिला बसणार एवढ्यात पोलिसांनी धावत येऊन नाट्यमयरित्या तिची सुटका केली. नशीब बलवत्तर होतं म्हणून ती फक्त काही सेकंदाच्या फरकानं वाचली. या महिलेला रेल्वेरुळावरून प्लॅटफॉर्मवर खेचण्यात पोलिसांना अडचण येत होती. ऐनवेळी दोन-तीन पोलीस तिच्या मदतीला धावून आले आणि तिला प्लॅटफॉर्मवर खेचून आणलं, म्हणून ती वाचली. पोलिसांचे प्रयत्न जराही कमी पडले असते तर मोठा अपघात घडला असता.

Video : म्हणून पोलीस स्टेशनमध्येच उडवला लग्नाचा बार

या महिलेला रुळ ओलांडताना ट्रेनच्या मोटारमननं पाहिलं होतं, तिला वाचवण्यासाठी आपण आपातकालीन ब्रेकही लावला होता. पण, वेगामुळे ट्रेन थांबणं शक्य नव्हतं, माझे प्रयत्न जरी अपयशी ठरले तरी ती ट्रेनखाली येण्यापासून थोडक्यात वाचली याचा मला आनंद आहे असंही तो चौकशीत म्हणाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 28, 2017 11:02 am

Web Title: cctv footage shows a woman being dragged to safety moments before a train comes
Next Stories
1 ‘गाढव’पणा! पोलिसांनी चक्क गाढवांना तुरुंगात धाडलं
2 ‘त्या’ दिवशी काम करायला लावल्याने इस्रायली नेत्याने दिला राजीनामा 
3 जिंकलस मित्रा! ‘एशिया गॉट टॅलेन्ट’मध्ये पोहोचलेला एकमेव भारतीय
Just Now!
X