16 January 2019

News Flash

मुंबई पोलिसांचं #RoadSafeTEA मीम पाहिलंत का?

सध्या 'चाय पिलो' असं म्हणणाऱ्या सोमवती महावर यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आहेत.

'चाय पिलो' असं म्हणणाऱ्या सोमवती महावर यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आहेत.

मुंबई पोलिसांचं ट्विटर अकांऊट हे तरुणांमध्ये सर्वाधिक प्रसिद्ध आहे. कारण नेहमीच एखादी गोष्ट, नागरिकांचे कर्तव्य, जबाबदाऱ्या समजावून सांगताना ते वेगवेळ्या मीम्स, कोड्यांचा आधार घेऊन ती पटवून देतात. तर सध्या ‘चाय पिलो’ असं म्हणणाऱ्या सोमवती महावर यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आहेत. एव्हाना ‘हाय फ्रेंड चाय पिलो’ या मजेशीर व्हिडिओमध्ये तुम्ही आपल्या मित्र – मैत्रिणींना टॅगही केलं असाल. तर या ट्रेंडमध्ये असलेल्या व्हिडिओचा वापर करून मुंबई पोलिसांनी एक महत्त्वपूर्ण संदेश दिला आहे.

हेल्मेटचं महत्त्व समजावून सांगताना त्यांनी महावर यांचा व्हिडिओ ट्विट केला आहे. त्यांच्या ‘चाय पिलो’ला वेगळा ट्विस्ट देत त्यांनी हेल्मेट घालण्याचं महत्त्व समजावून सांगितलं आहे. ‘हाय फ्रेंड हेल्मेट पहन लो, to have a Safe-Tea at home!’ असा संदेश त्यांनी लिहिला आहे.

मुंबई पोलिसांनी राबवलेल्या या #RoadSafeTEA कॅम्पेनचं सोशल मीडियावर कौतुक होत आहे.

First Published on June 13, 2018 3:33 pm

Web Title: chai pe lo aunty inspires mumbai police to tweet