चंदीगड लेक क्लबने आपल्या सर्व सदस्यांना एक नोटीस जारी केली आहे. आणि नोटीसमधील नियमांचे कठोरपणे पालन करावे अशी त्यांची इच्छा आहे. त्या नोटीसमध्ये इतर अनेक विचित्र नियमांसह चड्डीवर स्टँप आणि जिम सदस्यांसाठी वास चाचणी (Smell Test ) हवी असाही नियम आहे. याच नियमामुळे ही नोटीस सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. नोटीसचा फोटो  पत्रकार अर्शदीप संधू यांनी ट्विटरवर शेअर केला होता ज्याला आता हटवण्यात आले आहे. नोटीस व्हायरल झाल्यानंतर लेक क्लब व्यवस्थापनाने ही कोणातरी केलेली मस्करी  असल्याचे सांगितले.

काय आहे नोटीस?

चंदीगड लेक क्लबने जारी केलेल्या नोटीसमध्ये चार पॉईंटर्स आहेत. हे नियम सदस्यांनी पाळले पाहिजेत नाही तर  कारवाई केली जाईल असही सांगितलेलं आहे. क्लबच्या जिम किंवा रेस्टॉरंटमध्ये असताना सदस्यांनी या “विचित्र” नियमांचे पालन करावे अशी इच्छा आहे. आता हटवलेल्या ट्विटमध्ये पत्रकार अर्शदीप संधू यांनी लिहिले, “द लेक क्लब चंदीगड नोटिस. प्रत्येक ओळी वाचा. ‘अंडरगारमेंट मंजुरी स्टॅम्पिंग’ आणि ‘अनुमत वाईट शब्द’. जर तुम्ही शॉर्ट्स घालण्याचा प्लॅन करत असाल तर ‘तुमचे पाय शेव्ह करा.’’

एका नियमामध्ये असेही नमूद केले आहे की चड्डी घातलेल्या जिम सदस्यांनी पाय शेव्ह केलेले अर्थात पायावरचे केस काढलेले असावेत अन्यथा डिफॉल्टर्स दृष्टीस पडतील. “शॉर्ट्स घालणाऱ्या जिम वापरकर्त्यांनी अनावश्यक लक्ष टाळण्यासाठी पाय शेव्ह करणे आवश्यक आहे.” असं नोटीसमध्ये आहे.

जिम वापरकर्त्यांनी ‘योग्य जिम सूट’ घालणे आवश्यक आहे आणि अंडरगारमेंटवर विशेष लक्ष दिले पाहिजे असाही नोटिसमध्ये उल्लेख आहे. जिममध्ये ‘फक्त मान्यता असलेल्या अंडरगारमेंट’ला परवानगी असेल. हे एवढचं पुरेसे नव्हतं म्हणून की काय असा एक मुद्दा देखील आहे जो असे म्हणतो की चुकीच्या भाषेच्या वापरास परवानगी नाही. “फक्त परवांगी असलेले वाईट शब्द” क्रीडा संकुलात वापरले जातील असं लिहलेलं आहे.

नेटीझन्सच्या नोटीसवरील विनोदी टिप्पण्या

नेटिझन्सनी व्हायरल केलेल्या पोस्टवर विनोदी टिप्पण्या केल्या आहेत. एक युजर म्हणतो की “शेव्ह करण्यापेक्षा वॅक्सिंग केलं तर चालेल का?” तर दुसरा युजर म्हणतो की “ अंडरवेअरच ब्रण्ड कोण चेक करणार?”  “दुसऱ्या  भाषेत गैरवर्तन केले तर?” असे एकाने लिहले.

कोणीतरी मुद्दाम हा गैरप्रकार केला

सोशल मीडियावर नोटीस व्हायरल झाल्यावर तिथले प्रशिक्षक अनमोल दीप ANI शी बोलतांना म्हणतात, “आम्ही हे जारी केले नाही. सोमवारी आमची जिम बंद होती तेव्हा कोणीतरी हा गैरप्रकार केला असावा, आम्ही सीसीटीव्ही फुटेज तपासत आहोत. सकाळी आल्यावर माझ्या लक्षात आले. आधीच्या सर्व जुन्या नोटिसींनुसार त्या नोटीसवर जनरल मॅनेजरची स्वाक्षरी नव्हती. मी माझ्या वरिष्ठांना कळवले, त्यांनी अशी कोणतीही नोटीस न लावल्याचे सागितले. आम्ही ती नोटीस काढली.”

ही नोटीस आता काढून टाकण्यात आली आहे.