25 January 2020

News Flash

इन्स्टाग्रामची एक चूक शोधली अन् तो भारतीय झाला लखपती

इन्स्टाग्राममधील या बगमुळे कोणत्याही अकाउंटला हॅक करणे शक्य होते.

चेन्नईतील एका तरूणाने इन्स्टाग्राममधील एक बग शोधून काढला आहे. लक्ष्मण मुथैया असे त्या तरूणाचे नाव असून फेसबुकने त्याला बक्षीस म्हणून ३० हजार डॉलर म्हणजेच २० लाख रूपयांची रक्कम दिली आहे. मुथैयाने चूक लक्षात आणून दिल्यानंतर इन्स्टाग्राम आणि फेसबुकच्या सेक्युरिटी टीमने सुरूवातीला त्याच्यावर विश्वास ठेवला नव्हता. परवानगी न घेता इन्स्टाग्राम अकाउंट कसं हॅक करता येते, हे मुथैयाने सांगितले.

इन्स्टाग्राममधील या बगमुळे कोणत्याही अकाउंटला हॅक करणे शक्य होते. कोणत्याही इंस्टाग्राम अकाउंटवरून पासवर्ड रिसेट, पासवर्ड रिकव्हरी कोडसाठी रिक्वेस्ट पाठवली जाते. इन्स्टाग्रामकडून मिळालेला रिकव्हरी कोड टाकून हॅक करता येत असल्याची चूक मुथैयाने शोधून काढली.

मुथैयाने एका ब्लॉग पोस्टमध्ये लिहिले की, ”मी ज्यावेळी बेसबुकच्या सिक्युरिटी टीमला याबाबत माहिती दिली. काही माहिती कमी असल्यामुळे सुरूवातीला त्यांना पटवून देणं अशक्य झालं होतं. त्यानंतर मी आणखी माहिती गोळा करून त्यांना पटवून दिलं. यावेळी मला यश आलं. फेसबुक आणि इन्स्टाग्रामच्या टीमने बगला फिक्स केला आणि मला ३० हजार डॉलर बक्षीस दिलं. ‘

बग शोधण्याचे काम लक्ष्मण मुथैयाने या आधीही केलं नाही. यापूर्वीही त्याने फेसबुकच्या डेटा डिलीशन आणि डेटा डिस्क्लोजर या बगचा शोध घेतला होता.

First Published on July 19, 2019 2:25 pm

Web Title: chennai man finds hack prone instagram flaw wins rs 20 lakh nck 90
Next Stories
1 FaceApp च्या अटी आणि नियम वाचून तुम्हाला धक्काच बसेल
2 चंद्रावरील पावलाची पन्नाशी, गुगलचं खास डुडल
3 सावधान! FaceApp वापरताय? आधी हे वाचा..
Just Now!
X