राजकारणामध्ये सत्ता कधीच कायमची नसते, सत्ता कायम बदल असते असं म्हणतात. सत्ता फिरते तेव्हा अनेकांचे दिवस पालटतात असंही राजकारणाबद्दल बोलताना म्हटले जाते. भारतीय राजकारणाचा इतिहास पाहिला तर असे प्रसंग अनेकदा झाले आहे जेव्हा सत्ता गेल्याने नेत्यांचे दिवस फिरले आहेत. सध्या या सर्व गोष्टी इंटरनेटवर चर्चेत येण्यामागील कारण आहे माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांना झालेली अटक. चिदंबरम यांना आयएनएक्स मीडिया प्रकरणात अटक करण्यात आली आहे. त्यानंतर आणखी चार प्रकरणांत सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) चिदंबरम यांची चौकशी सुरू केल्याने त्यांच्या अडचणींत वाढ झाली आहे. मात्र चिदंबरम यांना अटक झाल्याने अनेकांना २०१० साली अमित शाह यांना झालेली अटक आठवली. सध्या केंद्रीय गृहमंत्री असणाऱ्या अमित शाह यांच्याविरोधात सीबीआयने अटकेची कावाई केली होती. त्यानंतर जामिन मिळाल्यावर दोन वर्ष तडीपार राहिल्यानंतर अमित शाह गुजरातमध्ये दाखल झाले तेव्हा एका बैठकीत त्यांनी एक शेर ऐकवला होता. तोच शेर आज अनेकांना आठवला आहे.

२०१० साली केंद्रात काँग्रेसची सत्ता असताना चिदंबरम गृहमंत्री होते. त्यावेळी गँगस्टर सोहराबुद्दीन शेखच्या बनावट एन्काऊंटर प्रकरणी सीबीआयनं २५ जुलै २०१० रोजी गुजरातचे माजी गृहराज्यमंत्री अमित शाह यांना अटक केली होती. गांधीनगर इथल्या सीबीआय ऑफिसमध्ये शाह हजर झाले असता त्यांना अटक करण्यात आली होती. ‘सोहराबुद्दीन बनावट चकमक’प्रकरणी सीबीआयनं अमित शाह यांच्यावर हत्येचा आरोप ठेवण्यात आला होता. त्यावेळीही राज्यात सत्तेत असणाऱ्या भाजपाने केंद्र सरकार सरकारी यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचा आरोप केला होता. अटक झाल्यानंतर अमित शाह यांना तीन महिने तुरुंगात काढवे लागले होते. त्यानंतर जामिनावर बाहेर आले होते. मात्र त्यानंतर त्यांना राज्य सरकारने तडीपार केले होते. त्यांनी दिल्लीत राहून सर्वोच्च न्यायलयात सीबीआयने दाखल केलेल्या या खटल्याविरुद्ध याचिका दाखल केली होती. मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर २०१४ साली सीबीआयने शाह यांच्यावरील सर्व खटले मागे घेतले. २०१० च्या घटनेला मागील महिन्यामध्ये नऊ वर्षे पूर्ण झाली. मात्र या नऊ वर्षांमध्ये परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. आता अमित शाह केंद्रीय गृहमंत्री असताना पी. चिदंबरम यांना सीबीआयने अटक केली आहे. याच पार्श्वभूमीवर अनेकांना शाह यांचा एक शेर आठवला आहे. जवळजवळ दोन वर्ष राज्यातून तडीपार केल्यानंतर शाह यांच्यावरील बंदी उठवण्यात आल्यानंतर ते राज्यात परत आले होते. त्यानंतर झालेल्या एका बैठकीमध्ये त्यांनी एक शेर सादर केला होता. ते म्हणाले होते…

father beaten
वसई : मुलीचे अपहरण केल्यानंतर पित्याला बेदम मारहाण, नया नगर पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा
Nagpur Police, 11 Robbers, Three Crore Rupee Jewelry Heist, robbery in nagpur, nagpur robbery, crime in nagpur, one woman hostage by robbers,
एकटी राहणारी महिला; तीन कोटींच्या दागिन्यांची लूट, हजार सीसीटीव्ही…
vasai crime news, wife s murder accused marathi news
वसई: पत्नीच्या हत्येचा आरोपी पॅरोलवरून फरार, वालीव पोलिसांनी ५ वर्षानंतर केली अटक
chandigarh doctor grandfather sbi share 500 rupees in 1994 know profit
याला म्हणतात खरी गुंतवणूक! आजोबांनी ३० वर्षांपूर्वी खरेदी केलेल्या ५०० रुपयांच्या शेअरवर नातू झाला लखपती

मेरा पानी उतरता देख
किनारे पर घर मत बना लेना
मैं समंदर हूं
लोटकर जरुर आऊंगा

अनेकांनी ट्विटवरुन हा शेर ट्विट केला आहे.

१)

२)

३)

४)

५)

एकंदरितच अनेक भाजपा समर्थकांनी अमित शाह यांनी आपले म्हणणे खरे करुन दाखवल्याच्या भावना ट्विटवरुन व्यक्त केल्या आहेत.

अटक होण्याआधी काय म्हणाले होते अमित शाह

सोहराबुद्दीन शेखच्या बनावट एन्काऊंटर याच प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर अमित शाह यांनी २४ जुलै रोजी मंत्रिपदाचा राजीनामा तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे सोपवला होता. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला होता. आपल्याला या प्रकरणात विनाकारण गोवण्यात येत असल्याचा आरोप अमित शाह यांनी केला होता. सीबीआयला हाताशी धरून काँग्रेस गुजरात सरकारचा आणि भाजप सरकारचा ‘पॉलिटिकल एन्काऊंटर’ करत असल्याचेही शाह यावेळी म्हणाले होते. “सीबीआयच्या ३० हजार पानांच्या आरोपपत्रात मी गुंड, खंडणीखोर, अपहरणकर्ता असल्याचं म्हटलं आहे. पण हे आरोपपत्र काँग्रेसने तयार केल आहे. माझ्यावर करण्यात आलेल्या एकाही आरोपात तथ्य नाही, ही काँग्रेसची चाल आहे. राजकीय हेतूने त्यांनी माझ्यावर ही चिखलफेक केली आहे. पण न्यायव्यवस्थेवर माझा पूर्ण विश्वास असून मी ही लढाई जिंकेन,” असा विश्वास शाह यांनी त्यावेळी बोलताना व्यक्त केला होता.