मंगळवारी अमेरिकन सोशल नेटवर्किंगवर एकच गोंधळ उडाला जेव्हा अमेरिकेच्या स्ट्रॅटर्जीक कमांडच्या ट्विटर अकाऊंटवरुन एक विचित्र मेसेज पोस्ट करण्यात आला. अमेरिकेतील अण्वस्त्रांसंदर्भातील सर्वात महत्वाची संस्था असणाऱ्या स्ट्रॅटर्जीक कमांडच्या ट्विटर हॅण्डलवरील या ट्विटमुळे चांगलाच गोंधळ उडाला.

चर्चेत असणाऱ्या या ट्विटमध्ये ‘l;;gmlxzssaw’ असा मजकूर लिहिण्यात आला होता. अमेरिकन अण्वस्त्रांच्या संरक्षणाचं काम करणाऱ्या संस्थेच्या अकाऊंटवरुन ट्विट करण्यात आलेला हा मजकूर नक्की काय आहे, हा एखादा कोड आहे का?, नक्की काय म्हणणं आहे अशाप्रकारच्या अनेक शंका नेटकऱ्यांनी उपस्थित केल्या. अर्थात हे ट्विट अवघ्या काही मिनिटांमध्ये डिलीट करण्यात आलं पण तोपर्यंत त्याचे स्क्रीनशॉर्ट व्हायरल झाले होते.

काहींनी ‘l;;gmlxzssaw’  हा न्यूक्लियर कोड असल्याचं म्हटलं तर काहींनी अमेरिकन संरक्षण संस्थेचं केंद्र असणारं पँण्टागॉन हॅक झाल्याची भीती व्यक्त केली. मात्र ट्विट डिलीट केल्यानंतर यासंदर्भात देण्यात आलेल्या स्पष्टीकरणामध्ये हे ट्विट एका कर्मचाऱ्याच्या घरातील लहान मुलाने चुकून केल्याचं सांगण्यात आलं. “कमांडचं ट्विटर अकाऊंट पाहणाऱ्या मॅनेजरने काही काळासाठी ट्विटर अकाऊंट सुरु केलं. मात्र नंतर त्याने फोनकडे लक्ष दिलं नाही. त्याचवेळी त्याच्या लहान मुलाने फोन हातात घेऊन त्याच्या किपॅडशी खेळण्यास सुरुवात केली. त्याचवेळी चूकून या मुलाकडून हे ट्विट करण्यात आलं,” असं सांगण्यात आलं आहे.

ज्या सोशल मीडिया मॅनेजरच्या मुलामुळे हा प्रकार घडला तो वर्क फ्रॉम होम म्हणजेच घरुन काम करत असल्याचं सांगण्यात आलं आहे. तसेच कमांडने जारी केलेल्या पत्रकामध्ये हे अकाऊंट हॅक झाल्याचा दावा खोटा असल्याचं सांगण्यात आलं आहे. द डेली डॉटने दिलेल्या माहितीनुसार फ्रीडम ऑफ इन्फॉर्मेशनने कमांडकडे घडलेल्या प्रकरासंदर्भात विचारणा केल्यानंतर याबद्दलचं स्पष्टीकरण दिलं. पाहुयात यावर नेटकऱ्यांनी नक्की काय म्हटलं आहे.

१)

२)

३)

४)

५)

६)

७)

८)

९)

१०)

११)

१२)

घडलेला प्रकार चुकून झाला असला तरी नेटकऱ्यांना या निमित्ताने चर्चेला विषय मिळाल्याचं चित्र सोशल मीडियावरील प्रतिक्रियांमधून दिसून येत आहे.