News Flash

थरार…! धावत्या ट्रेनसमोरुन मुलांनी घेतल्या पूर आलेल्या नदीत उड्या, मग…

व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद

देशात दिवसागणिक करोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. देश या महामारीचा सामना करत असताना सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. रेल्वे पटरीवरुन पाण्यात उडी मारणाऱ्या मुलांचा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकजण चकित झाले आहेत.

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की, भरधाव ट्रेनसमोरुन पाण्यात उडी मारत काही मुलं स्टंट करत आहेत. हा थरकाप व्हिडीओ पाहून अनेकचण चकित झाले आहेत. हा व्हिडीओ बिहारमधील चंपारण जिल्ह्यातील बेतिया येथील आहे. अमित आलोक यांनी हा व्हिडीओ आपल्या ट्विटरवर पोस्ट केला आहे.

नदीत उडी मारण्यासाठी, पोहण्याचा आनंद घेण्यासाठी काही मुलं या रेल्वेच्या पुलावर उभी आहेत. ट्रेनचा आवाज आला आणि ती जवळ आली की ते नदीमध्ये उडी मारतात असं पाहायला मिळत आहे. ट्रेनसमोर जीवघेणा स्ंटट करणाऱ्या मुलांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अंगावर काटा आणणारा हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी मुलांना चांगलेच खडसावलं आहे.

प्रसारमाध्यमांच्या रिपोर्ट्सनुसार, या व्हिडीओची रेल्वेनं दखल घेतली असून चौकशीचे आदेश दिले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 26, 2020 1:01 pm

Web Title: children jumped into river having come train on railway bridge nck 90
Next Stories
1 Kargil Vijay Diwas : ४ मे ते २६ जुलै १९९९ दरम्यान काय काय घडलं?; जाणून घ्या कारगिल युद्धाचा घटनाक्रम…
2 सच्चा पोलीस अधिकारी ! ड्युटी संपल्यावरही होतकरु विद्यार्थ्याला करतोय अभ्यासात मदत
3 केवळ मास्क घालून रस्त्यावर आला तो… होय ‘केवळ मास्क’
Just Now!
X