25 February 2021

News Flash

… या देशात धावते जगातील सर्वात वेगवान बुलेट ट्रेन!

वेग ऐकून थक्क व्हाल

३५० किलोमीटर प्रतिवेगाने धावणारी बुलेट ट्रेन १,२५० किलोमीटरचं अंतर अवघ्या साडेचार तासांत पार करणार.

नुकतेच जपानचे अध्यक्ष शिंझो आबे यांच्या उपस्थितीत मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा भूमिपूजन सोहळा पार पडला. मुंबई ते अहमदाबाद हे अवघे ५०० किलोमीटरचे अंतर ही ट्रेन अवघ्या दोन ते अडीच तासांत पार करू शकणार आहे. भारतातील ही पहिली बुलेट ट्रेन असणार आहे. तर दुसरीकडे चीनमध्ये जगातील सर्वात वेगवान बुलेट ट्रेन आजपासून धावायला सुरूवातही झाली आहे. बीजिंग आणि शांघाय अशा दोन महत्त्वाच्या शहरांना ही बुलेट ट्रेन जोडणार आहे.

वाचा : उत्तर कोरियातील नागरिकांची हेअरस्टाईल कशी असावी हे हुकूमशहाच ठरवतो

३५० किलोमीटर प्रतितास वेगाने धावणारी ही बुलेट ट्रेन दोन्ही शहरांमधील १,२५० किलोमीटरचं अंतर अवघ्या साडेचार तासांत पार करेल. ‘फ्यूशिंग’ असं या ट्रेनचं नाव आहे. चीनमध्ये सहा वर्षांनंतर इतक्या वेगाने पुन्हा एकदा बुलेट ट्रेन धावते आहे. याआधी ताशी ३०० किलोमीटरच्या वेगाने ट्रेन धावायच्या. पण २०११मध्ये झालेल्या अपघातात ४० लोकांचा मृत्यू झाला होता तर १९० लोक जखमी झाले होते. त्यामुळे बुलेट ट्रेनचा वेग कमी करण्यात आला. ‘फ्यूशिंग’चा सरासरी वेग हा ३५० तर जास्तीत जास्त वेग हा ४०० किलोमीटर प्रतितास असणार आहे. ‘फ्यूशिंग’मध्ये कोणत्याही प्रकारचा अपघात होणार नाही याची पूरेपूर काळजी घेतली आहे. जर आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली तर ट्रेनचा वेग आपोआप कमी होणार आहे. यापूर्वी शांघाय ते बीजिंग अंतर कापण्यासाठी सहा ते साडेसहा तासांचा अवधी लागायचा. परंतु, हा वेळ आता दीड तासाने घटणार आहे. या ट्रेनचं आयुष्य फक्त ३० वर्षांचं असणार आहे.

… आणि त्या झाल्या केरळच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 21, 2017 3:03 pm

Web Title: china gets worlds fastest bullet train
Next Stories
1 … आणि त्या झाल्या केरळच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक
2 ही कंपनी पाणीपुरी व्यवसायात गुंतवणार चक्क १०० कोटी!
3 …आणि पोपटाने केली ऑनलाइन खरेदी
Just Now!
X