आतापर्यंत एखादा देश धान्य, औषधे, लोखंडं, कपडे अशा अनेक गोष्टींची निर्यात किंवा आयात करताना तुम्ही ऐकले असेल पण चीन हा असा देश आहे जो आफ्रिकेतील देशांतून मोठ्या प्रमाणात चक्क गाढवांची आयात करतो. एका विशेष कारणासाठी चीनला गाढवांची गरज लागते याच कारणासाठी हा देश दरवर्षी जवळपास ४० लाख गाढवं आफ्रिकेतील काही देशांतून आयात करतो. CNNने दिलेल्या माहितीनुसार चीन मोठ्या प्रमाणात आफ्रिकेतील देशांमधून गाढवांची आयात करतो यामुळे या देशांत गाढवांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.

Viral Video : प्राणिसंग्रहालयातील कर्मचाऱ्यांचा ‘गाढव’पणा आणि बघ्यांना धसका!

आफ्रिकेतील नाइजर आणि बुर्किना फासो यांसारखे देश चीनला मोठ्या प्रमाणात गाढवं निर्यात करतात. चीनमधल्या गाढवांच्या मोठ्या मागणीमुळे येथल्या गाढवांची संख्या जवळपास ११ लाखांवरून ६ लाखांवर आली आहे. चीनमध्ये अनेक पारंपारिक औषध बनवण्यासाठी प्राण्यांचा वापर केला जातो. असेच एक औषध बनवण्यासाठी गाढवांचा वापर केला जातो. सर्दी, खोकला, एनिमिया, निद्रानाश यासाख्या आजारांवरील औषध बनवण्यासाठी या प्राण्याचा उपयोग करतात. २०१६ मध्ये नायजर या देशांतून जवळपास ८० हजार गाढवं चीनमध्ये निर्यात करण्यात आली पण या देशांतल्या गाढवांच्या संख्येत इतकी घट झाली या देशाने गाढवांची निर्यात थांबवली आहे.