आपल्या देशात कर्ज बुडव्यांची काही कमी नाही. ताजे उदाहरण घ्यायचे झालेच तर विजय माल्याचे आहेच. ९ हजार कोटींचे कर्ज बुडवून ते फरार आहेत. अशी अनेक उदाहरणं असतील. काहींना शिक्षा होतात तर काही कर्जबुडवे हातीही लागत नाही पण अशा कर्जबुडव्यांना अद्दल घडवण्यासाठी चीनच्या सुप्रिम कोर्टाने ऐतिहासिक निर्णय सुनावला आहे. कर्ज बुडवणा-यांवर बहिष्कार टाकण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयानुसार कर्ज बुडवणा-यांवर विमान किंवा बुलेट ट्रेनने प्रवास करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. तसेच त्यांच्या मुलांना देखील यापुढे खासगी शाळांत प्रवेश दिला जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

Viral : राष्ट्राध्यक्षांच्या खुर्चीवर इवांका बसली तरी कशी?

चीनची लोकसंख्या अधिक आहे. देशात बेरोजगारीही आहे. चीन हळूहळू आर्थिक मंदीच्या लाटेतही सापडतो आहे. त्यातून देशांतील कर्जबुडव्यांचे प्रमाण कमी करण्यासाठी चीनच्या सुप्रीम कोर्टाने ऐतिहासिक निर्णय सुनावला आहे. या निर्णयानुसार कर्जबुडव्यांना काही काम करण्यास बंदी घालण्यात आली आहे. या कर्जदारांचे पर्सनल आयडी नंबर ब्लॉक करण्यात आले आहे. हवाई प्रवासावरही बंदी घालण्यात आली आहे. तसेच या कर्जबुडव्यांना बुलेट ट्रेनने प्रवास करण्याचीही बंदी घालण्यात आली आहे. कोर्टाच्या निर्णयानुसार हे लोक आता घर भाड्याने देखील घेऊ शकणार नाही. तसेच त्यांच्या मुलांना देखील खासगी शाळांत प्रवेश मिळणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. देशातील कर्जबुडव्यांचे प्रमाण कमी व्हावे यासाठी हे कठोर पाऊल उचलले आहे.

Viral: ट्रम्प यांच्या ‘अमेरिका फर्स्ट’ व्हिडिओला ‘इंडिया सेकंड’ने प्रत्युत्तर

असे ६७ लाख लोक आहेत ज्यांनी बँका आणि वेगवेगळ्या संस्थामधून कर्ज घेतले आहे. या कर्जबुडव्यांची यादी सुप्रीम कोर्टाने आपल्या वेबसाईटवर जाहिर केली आहे. कर्जबुडव्यांवर जरब बसवण्यासाठी त्यांनी हा उपाय शोधला आहे.