करिअरमुळे अनेकांना स्वतःला वेळ देता येत नाही, आणि मग वयाच्या एका टप्यावर अशा व्यक्तींना एकटेपणा जाणवतो. हा एकटेपणा आफल्या कर्मचाऱ्यांना जाणवू नये म्हणून चीनमधील कंपनीने डेटींग लिव्हची संकल्पना आमंलात आणली आहे. मेडिकल लिव्ह, कॅज्यूअल लिव्ह, मॅटरनिटी लिव्ह प्रमाणे येथे वर्षातून एकदा डेटिंग लिव्ह देण्यात येते. वर्षातून सात दिवस महिलांना डेटिंग लिव्ह मिळते. अर्थात, या ‘लव्ह लीव्ह’ची सवलत फक्त वयाच्या तिशीत असलेल्या महिला कर्मचाऱ्यांसाठीच आहे.

‘साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट’नं दिलेल्या वृत्तानुसार, जेहिआंग शहरातील दोन कंपन्यांमध्ये या सुट्या दिल्या जात आहेत. येथे लुनर न्यू ईयर ब्रेकदरम्यान सात दिवसांची डेटिंग लीव्ह देण्यात येते. आपल्यावर प्रेम करणारी एखादी व्यक्ती या महिलांना शोधता यावी, हा या अतिरिक्त सुटीमागचा उद्देश आहे. जेहिआंग शहरातील एका शाळेनं अविवाहित शिक्षिकांना ‘लव्ह लीव्ह’ दिली होती. याच निर्णयाचं अनुकरण संबंधित कंपन्यांनीही केलं

या कंपनीच्या एचआरनुसार येथे जास्तीत जास्त महिला आउटफिट डेस्कवर काम करतात. यामुळे त्या जास्त काळ बाहेर घालवू शकत नाही. यामुळे त्या फीमेल एम्प्लॉयजला या सुट्या दिल्या जातात. यामुळे त्या पुरुषांना भेटू शकतील आणि डेट करु शकतील.