चीनमध्ये कोंबड्या, बकऱ्यांबरोबरच किडेही अन्नपदार्थ म्हणून खाल्ले जातात हे काही नवीन राहिले नाही. मात्र चीनमधील एका व्लॉगरचा अळ्या विषारी गोम आणि पाल खाताना लाइव्ह व्हिडिओ दरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सन या नावाने व्हॉग चालवणाऱ्या ३५ वर्षीय तरुणाचा दुर्देव अंत झाल्याची बातमी नाइन जीएजी या वेबसाईटने दिली आहे.

सन हा चीनच्या पूर्वेकडील हेईफीई शहरात राहत होता. सनच्या प्रेयसीला तो राहत्या घरात बेशुद्धावस्थेत अढळला. तिने त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले असता तिथे त्याला मृत घोषित करण्यात आले. चीनमध्ये वेगवेगळ्या गोष्टी एकाच वेळेस खाण्याचे चॅलेंज सोशल मिडियावरील व्हायरल झाले आहेत. याच चॅलेंजचा एक भाग म्हणून सन ‘डूयू’ या व्हिडिओ प्लॅटफॉर्मवरुन दारु पिता पिता विषारी गोम आणि पाल खाण्याचा व्हिडिओ त्याच्या १५  हजार फॉलोअर्ससाठी लाइव्ह टेलिकास्ट करत होता. या व्हिडिओमध्ये सनच्या मागे एक गोलाकार चार्ट दिसत असून तो चार्ट फिरवून बाणासमोर ज्या गोष्टीचे नाव येईल ती गोष्ट सन खात होता. गोलाकार चार्टवर विषारी गोम, पाल, कच्ची अंडी, दारु आणि व्हिनेगर अशा गोष्टींची नावे लिहिली होती असे स्थानिक वृत्तवाहिनी झियान न्यूजने म्हटले आहे.

Suresh Raina Helps Limping ms dhoni Viral Video
IPL 2024: चालताना त्रास होणाऱ्या धोनीला सुरेश रैन्नाने दिला आधार, व्हीडिओ होतोय तुफान व्हायरल
IPL 2024 PBKS Vs RR Match Updates in Marathi
PBKS vs RR : संजू सॅमसनने धोनीप्रमाणे दाखवली चतुराई, लियाम लिव्हिंगस्टोनच्या ‘रनआऊट’चा VIDEO होतोय व्हायरल
istanbul fire
इस्तंबूलच्या नाईटक्लबमध्ये भीषण आग, २९ जणांचा होरपळून मृत्यू!
Hardik Malinga Pushing Video Viral
MI vs SRH : हार्दिक पंड्याने लसिथ मलिंगाला ढकलल्याने चाहते संतापले, VIDEO होतोय व्हायरल

व्हिडिओ सुरु असताना सन अचानक खाली पडल्यानंतरही लाइव्ह वेबकास्ट सुरुच होते. सनची प्रेयसी घरी पोहचली तेव्हा तो वेबकॅमसमोर खाली बेशुद्धावस्थेत पडलेला अढळला. पोलिसांनी येऊन पंचानामा करेपर्यंत हा व्हिडिओ सुरुच होता. हा व्हिडिओ चीनमध्ये युट्यूबऐवजी वापरण्यात येणाऱ्या ‘डूयू’वरुन काढून टाकण्यात आला आहे.