‘तुमच्यापैकी अनेक लोक तिला पाहतच लहानाचे मोठे झाले असतील. तुमचं वय वाढलंय पण ती मात्र अजूनही तरुणच आहे. अगदी जशी २२ वर्षांपूर्वी होती तशीच’ अशा आशयाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूपच गाजतोय. सीसीटीव्ही या चिनमधल्या प्रसिद्ध वृत्तवाहिनीच्या वृत्त निवेदिकेचा हा व्हिडिओ आहे. तिचं नाव आहे याँग डॅन. गेल्या २२ वर्षांपासून याच वाहिनीवर ती हवामानचं वार्तांकन करत आहे.

मोदी आणि इमॅन्युअल यांच्या बॅनर्समागे लपवल्या ड्रेनेज लाईन्स, फोटो झाले व्हायरल

दररोज तीन ते चार हजार पोपटांना खाऊ घालणारा ‘बर्डमॅन’

विराटनं भेट दिलेली बॅट घेऊन ‘ती’ पोहोचली भारतात

याँगचा चेहरा देशात चांगलाच प्रसिद्ध आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्तानं या वाहिनीनं कतृत्त्ववान महिलांचा व्हिडिओ शेअऱ केला त्यात याँगचाही समावेश होता. १९९६ पासून ते आतापर्यंतचा याँगचा प्रवास यात दाखवण्यात आला होता. पण हा व्हिडिओ पाहताना अनेकांना एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे अशी की आपल्या उमेदीच्या काळात २२ वर्षांपूर्वी याँग जशी दिसत होती तशीच ती आताही दिसत आहे. ती सध्या ४४ वर्षांची आहे, तिचं वय वाढलं असलं तरीही ती पूर्वीसारखीच तरुण आहे. किंबहुना पूर्वीपेक्षा ती अधिकच तरुण अनेकांना भासत होती आणि याच कारणामुळे याँग सध्या ऑनलाइन सेन्सेशन ठरत आहे.