News Flash

Viral : कोण आला रे! कोण आला! सोशल मीडियावर ‘बॉडीगार्ड’ आला

तरूणींना अक्षरश: वेडं लावलंय

दक्षिण कोरियाच्या राष्ट्रध्यक्षांचा नवा सुरक्षारक्षक

सबसे हॉट, सबसे हार्ड
जो बुरा है उसकी वाट
आगया है देखो ‘बॉडीगार्ड’
सलमान खानच्या बॉडीगार्ड चित्रपटातील गाण्याच्या या ओळी दिल्या आहेत या खास हँडसम बॉडीगार्डसाठी. आता त्याच्यासाठी हे गाणं म्हणून दाखवायला एक कारणही तसंच आहे म्हणा. कारण या बॉडीगार्डने सोशल मीडियावरील अनेक तरूणींना अक्षरश: वेडं लावलंय.

गेल्यावर्षी सोशल मीडिया गाजवणारे दोन सामान्य चेहरे आठवतायत का? त्यात एक होता पाकिस्तानचा चहावाला आणि दुसरी होती नेपाळची भाजीवाली. या दोघांचे सौंदर्य इतके अप्रतिम होते की पुढचे काही आठवडे तरी या दोघांची जबरदस्त चर्चा सोशल मीडियावर होती. हे दोन्ही चेहरे रातोरात प्रसिद्ध झाले. त्यातला चहावाला तर सूपरमॉडेलही झाला. आता याच वाटेवर आणखी एक चेहरा आहे. सध्या ‘बॉडीगार्डबे’ या नावाने तो सोशल मीडियावर खूपच गाजतोय. हा कोणी चित्रपटातला अभिनेता किंवा मॉडेल वगैरे नाही बरं का! तर तो आहे दक्षिण कोरियाच्या राष्ट्रध्यक्षांचा नवा सुरक्षारक्षक. त्याचं नाव आहे चोई यांगजे. काही दिवसांपूर्वी कोरियन राष्ट्राध्यक्षाच्या सुरक्षा रक्षकांच्या चमूत तो दिसला होता.

राष्ट्राध्यक्षाच्या अगदी मागे उभ्या असलेल्या या देखण्या आणि राजबिंड्या तरुणाकडे अनेकांचं लक्ष गेलं नाही तर नवलंच. तेव्हा राष्ट्राध्यक्ष राहिले बाजूला अन् सगळीकडे चोईची चर्चा सुरू झाली. एवढी की कोरियन सोशल मीडियावर तर #bodyguardbae हा हॅशटॅग वापरून अनेकांनी त्याला प्रेमळ संदेशही पाठवायला सुरूवात केली आहे. कोईने आपल्या दिसण्याने इतक्या मुलींना घायाळ केलंय की अनेकांनी त्याला लग्नासाठी मागण्या वगैरे पण घातल्यात. आता या सगळ्या तरूणींचे दुर्दैव असे की चोई विवाहित तर आहेच पण त्याला दोन मुली देखील आहेत. पण काही असलं तरी पाकिस्तानी चहावाला आणि नेपाळच्या भाजीवालीनंतर बऱ्याच दिवसांनी नेटिझन्सना चर्चेसाठी नवा चेहरा मिळालाय.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 17, 2017 1:41 pm

Web Title: choi young jae south korean presidents bodyguard become social media sensation
Next Stories
1 सामान्य मुलाशी लग्नासाठी जपानच्या राजकन्येकडून पदत्याग!
2 Rashtrapati Bhavan: राष्ट्रपती भवनात १२ महिने फळं देणारं आंब्याचं झाड
3 Viral Video : जंगलात सर्वात ताकदवान कोण सिंह की मगर?
Just Now!
X