कर्नाटकातील तुमाकुरु जिल्ह्य़ातील पवगड तालुक्यात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हस्ते पवगड सौरऊर्जा प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन नुकतेच झाले. राज्यातील काँग्रेस सरकारच्या वतीने उचलण्यात आलेले पाऊल निश्चितच कौतुकास्पद आहे. त्याबद्दल खुद्द मुख्यमंत्र्यांनी अनेकांकडून वाहवाही मिळविली. अर्थात दोन हजार मेगावॅट इतकी वीजक्षमता निर्मिती असलेल्या या प्रकल्पाचे महत्त्व काय आहे, तो किती फलदायी ठरणार आहे, याची जाहिरात करणारे फलक प्रमुख शहरांमध्ये झळकले खरे. यात मुख्यमंत्र्यांचीही छबी झळकली.

ज्या पाश्र्वभूमीवर सिद्धरामय्या यांचे करारी बाण्याचे छायाचित्र झळकले, ते निश्चितच लक्ष वेधून घेणारे होते. पण छायाचित्रातील सौरऊर्जा प्रकल्प हा खराखुरा नव्हता. जर्मनीतील बवेरिया येथील ‘सोलर पार्क’चे ते छायाचित्र होते. ते कर्नाटकातील नव्हते! आता ‘नव्हते’ अशासाठी की पार्कसंबंधी ट्विटरवरून केलेली घोषणा नंतर कर्नाटक सरकारच्या वतीने मागे घेण्यात आली.