News Flash

योगी आदित्यनाथांनी दिली शिवी?; सोशल मीडियावर व्हिडीओ होतोय व्हायरल

एएनआयने सुधारित व्हिडीओ केला प्रसिद्ध; व्हिडीओशी छेडछाड केल्याचा काहीजणांचा आरोप

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ.

तापट स्वभावामुळे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरले आहेत. आदित्यनाथ यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतं. हा व्हिडीओ एएनआय वृत्तसंस्थेच्या प्रतिनिधीशी बोलत असतानाच असून, चिडलेल्या आदित्यनाथ यांनी समोरील व्यक्ती शिवी दिल्याचा आरोप केला जात आहे. समोरच्या व्यक्तीबद्दल अपशब्द वापरल्याने योगींवर टीकाही होत आहे. तर दुसरीकडे योगींना बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याचं काही नेटकऱ्यांनी म्हटलं आहे.

देशात करोना लसीकरण वेगानं सुरू आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रविवारी लसीचा पहिला डोस घेतला. त्यानंतर ते एएनआयशी बोलत होते. प्रतिक्रिया देत असतानाच कॅमेरला हलल्याने योगी आदित्यनाथ चिडले आणि त्यांनी व्हिडीओ पत्रकाराला शिवी दिली. सेवानिवृत्त आयएएस अधिकाऱी सूर्य प्रताप सिंह यांनी हा व्हिडीओ ट्वीट करत टीका केली आहे. ‘उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा हा आहे खरा चेहरा. थोडा आवाज झाला म्हणून एएनआयच्या कॅमेरामॅनला शिवी देत आहे. असो एएनआयसोबत असंच व्हायला हवं. देशातील सर्वात मोठी वृत्तसंस्था जेव्हा सरकारी प्रवक्त्यांपेक्षाही जास्त पुढे पुढे केल्या असं होणं साहजिक आहे. संताची भाषा ऐका,” असं सूर्य प्रताप यांनी म्हटलं आहे.

मुंबई युवक काँग्रेसनंही हा व्हिडीओ शेअर केला आहे. “हा आहे अजय बिश्त यांचा खरा चेहरा. एएनआयच्या पत्रकाराला कॅमेऱ्यासमोरच दिली शिवी. साधूच्या वेशात दिसणाऱ्या या तथाकथित योगींच्या डोक्यात भरलेली अमर्यादा, असंस्कृतता आणि खालच्या पातळीवरील शब्दाबद्दल भाजपाला भलेही अभिमान वाटेल, पण देश अपमानित झाला आहे,” अशी टीका युवक काँग्रेसने केली आहे.

एएनआयने टाकला सुधारित व्हिडीओ…

योगी आदित्यनाथ यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तो डिलीट करत सुधारित व्हिडीओ पोस्ट केला आहे. “अगोदर प्रसिद्ध करण्यात आलेल्या थेट प्रतिक्रियेचा व्हिडीओ मागे घेण्यात आला आहे. या व्हिडीओत योगी आदित्यनाथ करोना लसीकरणासंदर्भात माहिती देत आहेत,” असं एएनआयने म्हटलं आहे.

दुसरीकडे सेवानिवृत्त आएएस अधिकारी सूर्य प्रताप सिंह यांच्या पोस्टवर प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहे. संस्कारी संताची भाषा, असं काही जणांनी म्हटलं आहे. तर हाच प्रत्येक भाजपा कार्यकर्त्याचा हाच खरा चेहरा आहे. जोपर्यंत अंधभक्त आहेत, तोपर्यंत देशाला बरबाद करत राहणार आहेत, असं एका नेटकऱ्यांनं म्हटलं आहे. तर या व्हिडीओवरून काही जणांनी सूर्य प्रताप सिंह यांच्यावर टीका केली आहे. बेनीवाल नावाच्या व्यक्तीने उत्तर प्रदेश पोलिसांना टॅग करत म्हटलं आहे की, कृपया, राज्याच्या मुख्यमंत्र्यांना बदनाम करण्यासाठी छेडछाड करण्यात आलेला व्हिडीओ शेअर करणाऱ्याविरोधात करावाई करावी.” दुसऱ्या एकाने थेट योगी आदित्यानाथ यांनाच टॅग केलं असून, ‘सेवानिवृत्त पोलीस अधिकारी आपल्या नावाने हे पसरवत आहे,” असं म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 5, 2021 1:13 pm

Web Title: cm yogi adityanath allegedly abuses ani cameraperson video viral bmh 90
Next Stories
1 …म्हणून अंत्यसंस्काराकरिता २० तर दारुच्या दुकानासमोर २००० जणांना दिलीय परवानगी; जावेद जाफरीचं ट्विट
2 मालकिणीवर बलात्कार करुन पळून जात होता आरोपी, पाळीव कुत्रा ठरला ‘हिरो’
3 आनंद महिंद्रांचा मदतीचा हात! गोरगरिबांसाठी फक्त १ रुपयात इडली, ‘त्या’ आजीबाईंना मिळणार हक्काचं घर
Just Now!
X