ऑलिम्पिकमधील विजयामुळे पुष्कळ अ‍ॅथलिट आणि सहाय्यक कर्मचारी उत्साहित होत असतात. हा क्रीडा स्पर्धांचा सर्वात मोठा टप्पा आहे जिथे जगभरातील अ‍ॅथलीट आपल्या देशांसाठी येतात आणि जगातील सर्वोत्तम अ‍ॅथलिट्सविरूद्ध स्पर्धा करतात. सोमवारी ऑस्ट्रेलियन जलतरणपटू एरियन टिटमसने पाच वेळा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेती केटी लेडेकीला पराभूत करून महिलांच्या ४०० मीटर फ्री स्टाईल पोहोण्याच्या स्पर्धे मध्ये सुवर्णपदक जिंकले.

या विजयानंतर एरियन टिटमसच्या प्रक्षिकाच्या प्रतिक्रियेने सगळ्या जगाचं लक्ष वेधून घेतलं आहे. केटीवर मिळवलेल्या विजयानंतर प्रशिक्षक आणखी उत्साही झाले.

टोकियो अ‍ॅक्वाटिक्स सेंटरच्या स्टँडमध्ये, डीन बॉक्सॉलने आपला मास्क काढून टाकला, मोठ्याने ओरडला एका काचेच्या रेलिंगवर जोरात स्वतःला आदळले. बॉक्सॉलची भावनिक प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

दरम्यान, दोन्ही स्पर्धकांना चाहत्यांना निराश केले नाही. दोघांमध्येही अटीतटीची स्पर्धा होती. शेवटी, टिटमसने जागतिक स्तरीय कामगिरी केली आणि लेडेकीला पराभूत करत नवा ओशिनिया विक्रम तयार केला. सुरुवातील केटी लेडेकी स्पर्धेत पुढे होती. त्यानंतर टिटमसने तिला मागे टाकले. शेवटच्या ५० मीटरमध्ये लेडेकीने ऑस्ट्रेलियन जलतरणपटूला पकडण्याचा पुरेपूर प्रयत्न केला पण तिला  यश आले नाही. चीनच्या ली बिंगजीने कांस्यपदक जिंकून तिसरे स्थान मिळविले.