News Flash

‘इम्रानवरही बनव’, आपल्यासारखं फाडफाड इंग्रजी शिकवणाऱ्या पाकिस्तानी कॉमेडियनला शशी थरूर यांचा रिप्लाय

इंग्रजी भाषेतील अफाट शब्दसंग्रहासाठी काँग्रेस नेता शशी थरूर ओळखले जातात

इंग्रजी भाषेतील अफाट शब्दसंग्रहासाठी ओळखले जाणारे काँग्रेस नेता शशी थरूर पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आहेत. यावेळी एखाद्या राजकीय वक्तव्यामुळे नव्हे तर एका पाकिस्तानी कॉमेडियनमुळे ते चर्चेत आहेत. कराची येथील एका कॉमेडियनने सोशल मीडियावर शशी थरूर यांच्यासारखं फाडफाड इंग्रजी बोलायला शिकवणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता.

पाकिस्तानी कॉमेडियन अकबर चौधरीने अपलोड केलेला हा व्हिडिओ थोड्याचवेळात नेटकऱ्यांमध्ये व्हायरल झाला. व्हिडिओत थरूर यांच्याप्रमाणे इंग्रजी शिकवण्यासाठी अकबर कधी ऑक्सफर्ड डिक्शनरीचा ज्यूस बनवून पिताना दिसतो, तर कधी औषधाप्रमाणे शशी थरूर यांच्या भाषणाची सलाईन लावताना दिसतोय.


व्हिडिओच्या अखेरीस तो फाडफाड इंग्रजीत बोलताना दिसतो खरा, पण लक्ष देऊन ऐकल्यावर तेही डबिंग असल्याचं स्पष्ट होतं. सोशल मीडियावर अकबरचा इंग्रजी शिकवणारा हा व्हिडिओ नेटकऱ्यांना चांगलाच आवडला आणि थोड्याचवेळात तो व्हायरल झाला व शशी थरूर यांच्यापर्यंत पोहोचला. त्यावर थरूर यांनाही हा व्हिडिओ पाहून हसू आवरता आलं नाही, आणि तोच व्हिडिओ शेअर करुन त्यांनी पुढील व्हिडिओ पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर बनवण्याची विनंती अकबरला टॅग करुन केली.


दरम्यान, शशी थरूर यांच्या लाखो फॉलोअर्सना त्यांनी दिलेलं हे उत्तरही पसंतीस पडलं असून त्यावरही अनेक प्रतिक्रिया येत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 1, 2021 8:40 am

Web Title: comedian from pakistan presents tutorial on how to speak english like shashi tharoor congress leader asks him to make on imran khan sas 89
Next Stories
1 ‘एक मार्चपासून दूध १०० रुपये लीटर’; जाणून घ्या नक्की काय आहे हा प्रकार
2 पंजाबच्या गृहिणीचं रातोरात नशीब फळफळलं, १०० रुपयांच्या लॉटरी तिकीटावर जिंकले एक कोटी रुपये
3 PUBG खेळताना विद्यार्थ्याच्या प्रेमात पडली विवाहिता, भेटीसाठी वाराणसी गेली अन् घरी फोन करुन म्हणाली…
Just Now!
X