हत्तीचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर पसंत केले जातात. हत्ती हा प्राणी त्याच्या भव्यतेमुळे तर ओळखला जातोच पण त्याचसोबत त्याच्या मजेदार क्रियांमुळेही हत्तीची चर्चा केली जाते. नुकतीच हत्तीच्या अशाच एका कलेचं दर्शन पाकिस्तानी रिपोर्टरला घडलं. पाकिस्तानी चॅनेलचा रिपोर्टर लाईव्ह रिपोर्टिंग करत होता. त्यावेळी हत्तीने अशी एक कृती केली की तिथे असलेले सारेच हसू लागले.
इस्लामाबादच्या प्राणीसंग्रहालयात असलेल्या कावन नावाच्या हत्तीच्या एकाकीपणाबाबत रिपोर्टिंग करण्यात येत होतं. त्याच्या या एकाकीपणावर मात करण्यासाठी पाकिस्तानमधील इस्लामाबाद येथून कावनला कंबोडियाच्या अभयारण्यात स्थलांतरित करण्यात येणार आहे. तेथे तो उर्वरित आयुष्य आनंदाने घालवू शकणार आहे, अशा आशायाचं रिपोर्टिंग तो पाकिस्तानी पत्रकार करत होता. त्याच वेळी नेमकं हत्तीने मागून सोंडेत भरलेल्या पाण्याचा फवारा त्या पत्रकाराच्या अंगावर उडवला.
ڈئیر رپورٹر! نو ماسک؟ لٹ می سینیٹایز یو: کاوان
pic.twitter.com/9xOTuxAdaO— Islamabad (@Islaamabad) November 25, 2020
घडणाऱ्या प्रकाराबाबत पत्रकार सावध असल्याने तो पटकन बाजूला झाला. पण त्याची झालेली अशी धांदल पाहून आजूबाजूचे लोक मात्र चांगलेच हसले. सध्या हा मजेशीर व्हिडीओ तुफान व्हायरल होतं आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 26, 2020 2:25 pm