27 January 2021

News Flash

मृत्यू झाला मॅरेडोना यांचा, पण श्रद्धांजली वाहिली मॅडोनाला; नावामुळे उडाला गोंधळ!

मॅरेडॉना आणि मॅडोना या दोन नावांमध्ये झाली गफलत

(फोटो - ट्विटर )

अर्जेंटिनाचे माजी प्रसिद्ध फुटबॉलपटू दिएगो मॅरेडोना यांचं वयाच्या ६० व्या वर्षी निधन झालं. हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. जबरदस्त खेळाच्या जोरावर फुटबॉल क्षेत्रात दबदबा निर्माण करणाऱ्या मॅरेडोना यांच्या निधनामुळे समस्त क्रीडा विश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे. या दुःखद वृत्तानंतर जगभरातील त्यांचे चाहतेही श्रद्धांजली देत आहेत. पण ट्विटरवर श्रद्धांजली देताना काही जणांनी मॅरेडॉना आणि मॅडोना या नावामध्ये गफलत केली.

मॅरेडोना यांच्या निधनाचं वृत्त आल्यानंतर सोशल मीडियावर काही जणांचा मॅडोना आणि मॅरेडोना या नावांमध्ये गोंधळ उडाला आणि त्यांनी मॅरेडोनाएवजी पॉप सिंगर मॅडोनालाच श्रद्धांजली देण्यास सुरूवात केली. ६२ वर्षीय पॉप सिंगरला श्रद्धांजली देणारे अनेट ट्विट पोस्ट झाले. पण थोड्याचवेळात मृत्यू झालेली व्यक्ती मॅडोना नसून मॅरेडोना असल्याचं लक्षात आल्यानंतर मॅडोनाच्या सर्व चाहत्यांनी सुटकेना निश्वास सोडला. एक नजर मारुया मॅडोनाला श्रद्धांजली देणाऱ्या ट्विट्सवर :

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 27, 2020 9:07 am

Web Title: confused fans pay tribute to madonna as legendary footballer diego maradona dies sas 89
Next Stories
1 बॉस असावा तर असा… केलं असं काही की सर्व कर्मचारी झाले कोट्यधीश
2 अबब! चार वर्षाच्या मुलाने आईच्या मोबाइलवरुन मागवलं साडे पाच हजाराचं जेवण
3 Fact Check: योगा करणारी ही व्यक्ती मोदी आहेत का?; जाणून घ्या त्या व्हिडीओचं सत्य
Just Now!
X