News Flash

मोदींच्या तीन समर्थकांपैकी एकजण दुसऱ्या दोघांइतकाच मूर्ख, काँग्रेसचं वादग्रस्त ट्विट

काँग्रेसच्या सोशल मिडिया प्रभारी दिव्या स्पंदना यांनी नरेंद्र मोदी समर्थकांचा मूर्ख म्हणून उल्लेख केल्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे

मोदींच्या तीन समर्थकांपैकी एकजण दुसऱ्या दोघांइतकाच मूर्ख, काँग्रेसचं वादग्रस्त ट्विट

काँग्रेसच्या सोशल मिडिया प्रभारी दिव्या स्पंदना यांनी नरेंद्र मोदी समर्थकांचा मूर्ख म्हणून उल्लेख केल्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. दिव्या स्पंदना यांनी नरेंद्र मोदींचा फोटो असणारं एक मीम ट्विट केलं आहे. यामधून त्यांनी नरेंद्र मोदी आणि त्यांच्या समर्थकांवर टीका करण्यात आली आहे. यामुळे काँग्रेस आणि भाजपामध्ये शाब्दिक युद्ध रंगण्याची शक्यता आहे.

दिव्या स्पंदना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या निकटवर्तीय मानल्या जातात. त्यांनी नरेंद्र मोदींचा फोटो असणारं एक ट्विट केलं आहे. या फोटोमध्ये लिहिण्यात आलं आहे की, ‘तुम्हाला माहिती आहे का ? मोदींच्या तीन समर्थकांपैकी एकजण इतर दोघांइतकाच मूर्ख असतो’. यावेळी त्यांनी माझं फेव्हरेट…असंही लिहिलं आहे.

दिव्या स्पंदना यांच्या या ट्विटवर अनेक युजर्सनी टीका केली आहे. अभिनय क्षेत्रात अपयशी झालेले आयटी सेलचे प्रमुख आहेत असा टोला एका युजरने लगावला आहे. तर दुसऱ्या एका युजरने नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधींचा फोटो वापरत राहुल गांधींचे सर्व चाहते त्यांच्याएवढेच मूर्ख आहेत अशी टीका केली.

दिव्या स्पंदना यांनी वादग्रस्त ट्विट करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधी सप्टेंबर महिन्यात त्यांनी नरेंद्र मोदींचा चोर म्हणून उल्लेख केला होता. ज्यानंतर त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल कऱण्यात आला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 14, 2019 12:58 pm

Web Title: congress media head divya spandana tweets meme calling narendra modi supporters stupid
Next Stories
1 ..म्हणून स्टीफन हॉकिंग यांना नोबेल मिळाले नाही?
2 महिलेचा बँक बॅलेन्स पाहून चोराने परत केले पैसे
3 स्वत:च्या लग्नात उशिरा पोहोचूनही टाळ्यांचा गजरात स्वागत
Just Now!
X