जगभरात करोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. यामुळे हजारो लोकांना आपला जीवही गमवावा लागला आहे. अमेरिकेसारख्या देशानंही राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली आहे. भारतातही करोनामुळे दोन जणांचा मृत्यू झाला आहे. नुकतीच खासदार रामदास आठवले यांची “करोना गो ये मैने दिया था नारा…” ही कविता व्हायरल झाली होती. त्यानंतर आता काँग्रेस खासदार शशी थरूर यांची करोनावरील ‘भाई मेरे…हाथ साबुन से धोना’ अशी कविता व्हायरल होत आहे.

शशी थरूर यांनी हिंदीमध्ये ट्विटरवरून एक कवित शेअर केली आहे. शशी थरूर आपल्या इंग्रजीसाठी सर्वांच्या परिचयाचे आहेत. परंतु त्यांनी हिंदीतून एक कविता शेअर केली आहे. त्यांनी ट्विट केल्यानंतर काही वेळात त्यांचं ट्विट मोठ्या प्रमाणात व्हायरल झालं. अनेक नेटकऱ्यांनीही त्यांना रिट्विट केलं आहे. नुकतीच बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी एक व्हिडीओ ट्विट केला होता. त्यामध्ये ते एक कविता म्हणताना दिसले होते. यामध्ये त्यांनी करोनापासून सुरक्षित राहण्यासाठी आणि त्यापासून वाचण्यासाठी उपाय सांगितले होते. त्यांच्याव्यतिरिक्त रामदास आठवलेंचीही कविता व्हायरल झाली होती.

काय आहे कविता?
Corona Corona का डर खा रहा है
ये लफ्ज़ अब हमारा भी सर खा रहा है
किसी, चीनी ने खाया है गलती से कुछ
वो कुछ अब, नारी और नर खा रहा है
घरेलू से नुस्खे बताते हैं सब
किस-किस की मानें, बता मेरे रब?
भगाना है गर हमको दानव घिनोना
भाई मेरे…हाथ साबुन से धोना