28 February 2021

News Flash

अरे बापरे! १९६ किलोंच्या अजस्त्र गोरीलाची झाली करोना चाचणी; फोटो व्हायरल

करोना विषाणूच्या संसर्गापासून माणसाप्रमाणे वन्यप्राण्यांचीही घेतली जात आहे काळजी

मियामी (अमेरिका) : एका अजस्र गोरीलाची करोनाची चाचणी करण्यात आली.

जगासाठी सध्या करोना विषाणूच्या चाचण्या ही बाब सर्वाधिक प्राधान्यक्रमाचा विषय बनला आहे. कुठे ना कुठे माणसांचे स्वॅब घेताना त्यांना रुग्णालयात अॅडमिट केल्याची छायाचित्रे आपल्याला पहायला मिळत आहेत. दरम्यान, एक वेगळाच रुग्ण अमेरिकेतील फ्लोरिडा प्रांतातील लॅबमध्ये चाचणीसाठी दाखल झाल्याचे फोटो सध्या सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. हा साधासुधा रुग्ण नसून प्रचंड आकाराचा आणि १९६ किलो वजनाच्या एक गोरिला माकड आहे. विशेष म्हणजे लॅबमध्ये इतर चाचण्यांबरोबरच या गोरिलाची करोनाची चाचणी देखील करण्यात आली. गोरिलावर उपचार करणं हे डॉक्टरांसाठी देखील एक मोठं आव्हानंच होतं. अमेरिकेतील फ्लोरिडा प्रांतातील मियामी शहरात हा प्रकार घडला आहे.

शांगो नावाचा हा गोरिला मियामी-दाडे प्राणीसंग्रहालयात (झू मियामी) वास्तव्यास असून या प्राणी संग्रहालयातील त्याचा छोटा भाऊ बर्नी याच्याबरोबर त्याची मोठी हाणामारी झाली. यामध्ये ३१ वर्षीय शांगो गंभीर जखमी झाला. त्यामुळे त्याला वैद्यकीय चाचण्यांसाठी एका लॅबमध्ये नेण्यात आले. या ठिकाणी त्याला भूल देऊन त्याचा एक्स-रे, अल्ट्रासाउंड, टीबीची चाचणी आणि सर्वांत महत्वाचं कोविड-१९ची चाचणी देखील करण्यात आली. सुदैवानं त्याची कोविडची चाचणी निगेटिव्ह आली आहे.

शांगो आणि त्याचा भाऊ बर्नी या दोघांना सन २०१७ मध्ये झू मियामीमध्ये दाखल करण्यात आलं. त्यांना सॅनफ्रॅन्सिस्को झूमधून येथे आणण्यात आलं होतं. त्यांचा जन्मही येथेच झाला होता. पूर्ण वाढ झालेल्या गोरिलांमधील भांडण हे साधारण भांडण नसतं. इतर वेळी शांगो आणि बर्नी हे एकमेकांपासून दूर राहून चांगलं राहत होते. मात्र, अचानक त्यांच्यामध्ये इतकं मोठं भांडण कसं झालं याचं प्राणी संग्रहालयातील कर्मचाऱ्यांनाही आश्चर्य वाटत आहे. या दोघांचं भांडण एकमेकांना शारिरीक इजा करुनच थांबलं. या भांडणामध्ये शांगोच्या शरिरावर चावल्याच्या मोठ्या जखमा झालेल्या होत्या. त्यामुळे त्याची वैद्यकीय चाचणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. झू मियमीने आपल्या फेसबुकवरुन याबाबत माहिती दिली आहे.

दरम्यान, वैद्यकीय तपासणीनंतर शांगोला पुन्हा प्राणीसंग्रहालयात नेण्यात आले असून त्याला निरिक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. मात्र, येथील त्याच्या भावाला दुसऱ्या ठिकाणी हालवण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 13, 2020 3:01 pm

Web Title: corona test of a huge gorilla weighing 196 kg the photo went viral on social media aau 85
टॅग : Coronavirus
Next Stories
1 मास्क न घालणाऱ्यांची ‘शाळा’, तब्बल ५०० वेळेस लिहावं लागेल हे वाक्य
2 …म्हणून चीनच्या ‘त्या’ ड्रायव्हरने बस तलावात उलटवली, 21 जणांचा झाला मृत्यू
3 करोनामुळे नोकरी गेली पण नशीबानं या भारतीयाला मिळाली कोट्यधीची Lamborghini
Just Now!
X