News Flash

…म्हणून लॉकडाउनदरम्यानही बिअर कंपनीने ९३ वर्षीय आजीबाईंच्या घरी पाठवले १५० कॅन्स

सध्या या आजीबाई चर्चेचा विषय ठरल्या आहेत

ऑलिव्ह व्हेरोनोसी (सर्व फोटो: FACEBOOK/KDKA-TV | CBS PITTSBURGH)

जगभरातील १८० हून अधिक देशामध्ये करोनाचा फैलाव झाला आहे. करोनाचा आणखीन प्रादुर्भाव होऊ नये म्हणून अनेक देशांनी लॉकडाउनची घोषणा केली आहे. त्यामुळे अनेक देशामध्ये केवळ अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या यंत्रणा काम करताना दिसत आहे. अनेक देशामध्ये बार, हॉटेल आणि दारुची दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. भारतामध्येही दारुची दुकाने बंद असल्याने काळ्या बाजारामध्ये मद्यविक्री होत असल्याची प्रकरणे समोर आली आहेत. असं असतानाच आता अमेरिकेमधून एक आगळीवेगळी बातमी समोर आली आहे.

अमेरिकेतील पेनसिल्व्हेनिया राज्यामधील ऑलिव्ह व्हेरोनोसी नावाच्या ९३ वर्षीय आजींचा एक फोटो मागील काही दिवसांपासून सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाला होता. या फोटोमध्ये ऑलिव्ह या हातामध्ये एक पोस्टर पकडून उभ्या असलेल्या दिसत आहेत. या पोस्टरवर ‘I Need more Beer’ म्हणजेच ‘मला आणखीन बिअर हवीय’ असा मजकूर लिहिलेला होता. हातात पोस्टर पकडलेल्या आजीबाईंच्या एक हातामध्ये कूर्स लाइट बिअरचा कॅन्सही दिसत आहेत. हा फोटो ऑलिव्ह यांच्या नातेवाईकानेच सोशल मिडियावर सर्वात आधी पोस्ट केला होता. त्यानंतर हा फोटो व्हायरल झाला. केडीकेए टीव्ही या स्थानिक वृत्तवाहिनेनही त्यांच्या फेसबुक पेजवरुन हा व्हायरल फोटो पोस्ट केला होता.

फोटो: FACEBOOK/KDKA-TV | CBS PITTSBURGH

हा फोटो व्हायरल झाल्यानंतर सीबीएस न्यूजने ऑलिव्ह यांच्याकडे यासंदर्भात विचारणा केली. “माझ्याकडे बिअरचे केवळ १२ कॅन उरले होते. मी रोज रात्री बिअर पिते. बिअरमध्ये व्हिटॅमिन्स असतात. त्यामुळे जोपर्यंत तुम्ही बिअरचे अती सेवन करत नाही तोपर्यंत ती आरोग्यासाठी चांगली असते,” अशी प्रितिक्रिया ऑलिव्ह यांनी वृत्तवाहिनीशी बोलताना नोंदवली होती.

ऑलिव्ह या सध्या लॉकडाउनमुळे घरातच अडकून पडल्या आहेत. त्यांचे वय अधिक असल्याने आणि अमेरिकेमध्ये वेगाने करोनाचा फैलाव होत असल्याने त्या घराबाहेर पडण्याचं टाळतात. त्यामुळेच त्यांनी बिअर मिळावी अशी इच्छा व्यक्त करणारे पोस्टर हातात धरले होते. त्यांच्या या फोटोला ५० हजारहून अधिक जणांनी शेअर केलं आहे. २७ हजारहून अधिक जण या फोटोवर रिअ‍ॅक्ट झाले आहेत. अनेकांनी हा फोटो पाहून खूप हसू आल्याचंही या फोटोवर कमेंट करुन म्हटलं आहे. या आजीबाई फोटोमुळे सोशल नेटवर्किंगवरील सेलिब्रिटी झाल्या.

मात्र ही गोष्ट एवढ्यावर थांबली नाही. ज्या कूर्स लाइटचा कॅन घेऊन आजींनी फोटो काढला होता त्या कंपनीचे मालक मॉलसन कूर यांनी या आईंसाठी चक्क १५० बिअर कॅन्स त्यांच्या घरी पाठवले.

फोटो: FACEBOOK/KDKA-TV | CBS PITTSBURGH

यासंदर्भात कंपनीच्या प्रवक्त्यांनी अमेरिकेतील एका वृत्तपत्राला माहिती दिली. “आम्ही जेव्हा ऑलिव्ह यांचा फोटो आम्ही पाहिला. तेव्हा या गंभीर प्रसंगातही अनेकांच्या चेहऱ्यावर हसू आणणाऱ्या या आजींसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे असं आम्हाला वाटलं. तसेच आमच्या कंपनीच्या बिअरबद्दल त्यांनी व्यक्त केलेल्या प्रेमाची परतफेड करण्याची ही चांगली संधी असल्याचे आम्हाला वाटले. करोनाची साथ नसती तरी आम्ही ऑलिव्ह यांची इच्छा पूर्ण केली असती. त्यामुळेच आम्ही या गंभीर काळामध्ये लोकांना हसवणाऱ्या या आजींची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांना १५० कॅन्स पाठवले,” असं कंपनीच्या प्रवक्त्यांनी सांगितले.

फोटो: FACEBOOK/KDKA-TV | CBS PITTSBURGH

आजीबाईंच्या घरी कंपनीने बिअरचे १५० कॅन्स पोहचवल्यानंतर खरोखरच या आजीबाईंनी नशीब काढले असे अनेक नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. आता हा १५० बिअर कॅनचा साठा आजींना किमान पाच महिने सहज पुरेल असंही काहींनी म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 16, 2020 3:13 pm

Web Title: coronavirus 93 year old woman who held up i need beer sign gets sweet surprise after company sends over 150 cans scsg 91
टॅग : Coronavirus
Next Stories
1 कौतुकास्पद! सफाई कामगाराने दोन महिन्यांचा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दिला
2 करोना बाधितांवर उपचार करताना पाक डॉक्टरांचा डान्स, गंभीरनं शेअर केला Video
3 महाराष्ट्र पोलीस म्हणतात, ‘ही आहेत 13 Reasons Why ज्यामुळं घराबाहेर पडायचा विचार करायचा नाय’
Just Now!
X