रशियामध्ये करोनाग्रस्तांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. बुधवारपर्यंत (२० मे २०२०) रशियामधील करोनाग्रस्तांच्या आकडेवारीने तीन लाखांचा टप्पा ओलांडला. मात्र एकीकडे करोनामुळे भितीचे वातावरण असतानाच दुसरीकडे राजधानी मॉस्कोपासून १०० मैल दक्षिणेला असणाऱ्या तुला शहरामध्ये सध्या चर्चा आहे एक तरुण नर्सची. या चर्चेमागील कारण म्हणजे करोनाग्रस्त पुरुषांच्या वॉर्डमध्ये नियुक्त करण्यात आलेल्या या नर्सने केलेले नियमांचे उल्लंघन. वयाच्या विशीत असणाऱ्या या नर्सने पीपीई कीट घालण्यानंतर खूप उकडत असल्याचे कारण देत केवळ अंतर्वस्त्रं  (लाँजरी (Lingerie)) घालून रुग्णांवर उपचार केले. धक्कादायक बाब म्हणजे करोना वॉर्डमध्ये वापरण्यात आलेले पीपीई कीट हे पारदर्शक प्लॅस्टीकपासून बनवण्यात आले होते. त्यामुळेच या नर्सचे फोटो व्हायरल झाले आहेत. यानंतर या नर्सवर रुग्णालय प्रशासनाने कारवाई केली असल्याचे वृत्त ‘मेल वन’ या वेबसाईटने दिले आहे.

तुला येथील करोनाग्रस्तांसाठीच्या रुग्णालयामधील पुरुषांच्या वॉर्डमधील या नर्सचा फोटो एका रुग्णानेच सोशल नेटवर्किंगवरुन शेअर केला. त्यानंतर पाहता पाहता हा फोटो व्हायरल झाला. याचीच दखल घेत रुग्णालय प्रशासनाने या नर्सने कामावर असताना ड्रेस कोडचे पालन केले नाही असा आरोप ठेवत तिच्यावर कारवाई केल्याचे मेल वनने आपल्या वृत्तात म्हटलं आहे. या नर्सच्या कृत्याबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी केली असता तिने नर्सच्या ड्रेसवर पुन्हा पीपीई कीट घातल्यानंतर खूप गरम होतं असं सांगितलं. तसेच आपण घातलेले पीपीई कीट पारदर्शक असल्याची कल्पना नसल्याचेही तिने ‘तुला स्थानिक रुग्णालया’तील अधिकाऱ्यांना सांगितले आहे.

Baramati Namo Maharojgar Melava
निमंत्रण पत्रिकेतील आणखी एक घोळ सुधारण्यासाठी प्रशासनाची धावाधाव
tax fraud case
१७५ कोटींचे कर फसणूक प्रकरण : विक्रीकर अधिकारी व १६ जणांवर गुन्हा दाखल, एसीबीची कारवाई
traffic problem in Pune
पुण्यातील बिघडलेल्या वाहतूक समस्येची उच्च न्यायालयाकडून दखल, परिस्थितीचा फेरआढावा घेण्याचे पुणे पोलीस आयुक्तांना आदेश
Pune pubs
पुण्यात आता मध्यरात्री दीडपर्यंत ‘चिअर्स’… पब, मद्यालयांबाबत पोलीस आयुक्तांचा मोठा निर्णय
फोटो सौजन्य: Mail Online

स्थानिक आरोग्य विभागानेही या नर्सने कपड्यासंदर्भातील नियामांचे उल्लंघन केल्याप्रकरणी तिच्यावर कारवाई करण्यासंदर्भातील आदेश दिले आहे. रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या नर्सने आधी केवळ लाँजरी घातल्याचे सांगितले होते. नंतर मात्र तिने आपण पीपीई कीटच्या आतमध्ये स्विमींग सूट घातल्याचे सांगितले. या नर्सवर नक्की काय कारवाई करण्यात आली आहे हे स्पष्ट झाले नसले तरी नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी चौकशी केल्यानंतर कारवाई करण्यात आल्याचे समजते.  ‘मेल वन’ने दिलेल्या वृत्तानुसार या नर्सविरोधात कोणत्याही रुग्णाची काहीही तक्रार नव्हती मात्र तिला अशा कपड्यांमध्ये पाहिल्यावर काहीजणांना नक्कीच विचित्र वाटलं होतं असं एका रुग्णाने सांगितलं आहे.