28 September 2020

News Flash

Coronavirus: घरी बसून कंटाळलेल्या व्यक्तीने बनवले ‘करोना भजी’; नेटकरी झाले सैराट

सध्या हे भजी चर्चेत आहेत

करोनाचा प्रादूर्भाव देशभरात वाढत असल्याने सरकारने अनेक महत्वाचे निर्णय घेतले असून नागरिकांना घराच्या बाहेर निघू नये असे आवाहन केंद्र तसेच राज्य सरकारकडून करण्यात आलं आहे. त्यामुळे अनेकजण घरुनच काम करत आहेत. तर घरून काम करणे शक्य नसणाऱ्यांना सक्तीची रजा मिळाली आहे. मात्र करोनाचा धोका पाहता घरात बसून राहण्याशिवाय अनेकांकडे काही पर्यायच शिल्लक नाहीय. त्यामुळेच अनेकांनी सोशल नेटवर्किंगवर दोन दिवसातच कंटाळा आल्याच्या तक्रारी करण्यास सुरुवात केली आहे. मात्र एका व्यक्तीने याच बोरींगपणावर मात मिळवण्यासाठी चक्क करोना विषाणूच्या आकाराचे भजी बनवले आहेत.

कनिष्का विजयशेखरा या ट्विटवर अकाऊंटवरुन करोना विषाणू म्हणजेच कोवीड-१९ या विषाणूच्या आकाराचे भजी केल्याचे फोटो पोस्ट करण्यात आला. या फोटोला “मस्त तळलेले भजी” अशी कॅप्शन देण्यात आली आहे. विशेष म्हणजे या व्यक्तीने कुठेही करोनाचा उल्लेख कॅप्शन देताना केलेला नाही.

करोनाचा उल्लेखही या ट्विटमध्ये नसताना अनेकांनी या भजीचा आकार हा करोनाच्या विषणूसारखा असल्याचे मत नोंवदलं आहे.

हे भजी कोवीड-१९ सारखे का दिसत आहेत?

कोणाला हवेत करोना भजी?

भजीला हात लावण्याआधी हात धू

हा तर करोना पकोडा

या भजीच्या आकारावरुन चर्चा सुरु असतील तरी हे भजी तेलकट असल्याचेही भजी बनवणाऱ्या व्यक्तीने म्हटलं आहे. “हे भजी तेलकट असल्याने आरोग्याच्या दृष्टीने इतके चांगले नाहीयत,” असंही ट्विट या व्यक्तीनं केलं आहे. असं असलं तरी काहींनी या व्यक्तीला या भजीची रेसिपी काय आहे असा सवाल ट्विटवर विचारला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 23, 2020 3:20 pm

Web Title: coronavirus bored during self quarantine someone decided to fry pakodas in the shape of novel coronavirus scsg 91
टॅग Coronavirus
Next Stories
1 “मोदीजी, तुमचा व्हिडीओ दाखवा… घंटा वाजवलीत की टाळ्या?”
2 करोना व्हायरस : लोकांनी घरात राहावं यासाठी रशियाने रस्त्यावर सोडले 800 वाघ-सिंह?
3 “शाबास महिंद्रा, देशाच्या व्यवसाय क्षेत्राला अशाच दूरदृष्टी-नि: स्वार्थी नेतृत्वाची गरज!”
Just Now!
X