देशभरामध्ये करोनाग्रस्तांचा आकडा वेगाने वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर देशातील लॉकडाउनचा कालावधी वाढण्यात येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज देशभरातील राज्यांच्या मुख्यमंत्र्याशी केलेल्या चर्चेमध्ये अनेक मुख्यमंत्र्यांनी लॉकडाउनचा कालावधी वाढवण्याच्या बाजूने मत दिल्याचे वृत्त आहे. जनतेने लॉकडाउनदरम्यान घरात थांबवे असं आवाहन सरकारने केले आहे. मात्र असं असूनही अनेकजण रस्त्यांवर फिरताना दिसत आहे.

अनेक कलाकार, नेते, खेळाडू आणि पोलिसांनीही सोशल नेटवर्किंगवरुन नागरीकांना घरीच थांबण्याचं आवाहन केलं आहे. काँग्रेसचे नेता आणि प्रसिद्ध वकील अभिषेक मनु सिंघवी यांनाही शनिवारी असेच एक ट्विट केलं. यामध्ये त्यांनी थेट रामायणामधील काही उदाहरणं आणि संदर्भ दिले आहेत. लोकांनी आपल्या घरातच रहावे असं सिंघवी यांनी म्हटलं आहे. “लॉकडाउनच्य काळात घरीच थांबा आणि सुरक्षित राहा. रामायणमध्ये जोपर्यंत सिता लक्ष्मणरेषेच्या आतमध्ये होती सुरक्षित होती. कुंभकर्ण पण जोपर्यंत घरात झोपलेले होता सुरक्षित होता,” असं ट्विट सिंघवी यांनी केलं आहे.

या ट्विटवरुन काही जणांनि सिंघवी यांना ट्रोल करण्याचाही प्रयत्न केला आहे.

रामायणाला काल्पनिक म्हणणारे आज त्याचाच संदर्भ देत आहेत

तुम्ही रामायण बघू लागलात

कुंभकर्ण कुठून आला?

करोनामुळे मागील २४ तासांमध्ये भारतात ४० जणांचा मृत्यू झाला असून एक हजार ३५ नवे रुग्ण आढळून आले आङेत. देशातील रुग्णांची संख्या सात हजार ४४७ इतकी झाली आहे. यापैकी सहा हजार ६६५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. ६४३ रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. तर मरण पावलेल्यांची संख्या २३९ वर पोहचली आहे.