देशामध्ये करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी २१ दिवासांच्या लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. १४ एप्रिलपर्यंत सुरु राहणा-या या लॉकडाउनदरम्यान भारतीय मोठ्या प्रमाणात पॉर्न कंटेंट पाहत असल्याची माहिती पॉर्नहब या वेबसाइटने जारी केलेल्या अहवालामधून समोर आली आहे. पॉर्नहबने २ एप्रिल रोजी जारी केलेल्या अहवालामध्ये लॉकडाउन सुरु झाल्यापासून पॉर्न पाहणा-या भारतीयांची संख्या वाढल्याचं निरिक्षण नोंदवलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जगभरामध्ये करोनाने थैमान घातलं असल्याने अनेक देशामध्ये लॉकडाउनची घोषणा करण्यात आलेली आहे. याच पार्श्वभूमीवर पॉर्नहबने त्यांच्या वेबसाईटवरील प्रिमियम कंटेंट जगभरातील सर्व देशांमध्ये एका महिन्यासाठी मोफत उपलब्ध करुन देत असल्याची घोषणा केली होती. कंपनीने करोनाच्या पार्श्वभूमीवर न्यूयॉर्कमध्ये ५० हजार मास्क वाटप करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर त्यांनी करोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झालेल्या इटलीमध्ये लॉकडाउन जाहीर झाल्यानंतर तेथील युझर्ससाठी मोफत प्रिमियम सेवा देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर करोनाचा प्रादुर्भाव युरोपसहीत जगभरातील इतर देशामध्येही वाढल्यावर कंपनीने जगभरामध्ये प्रिमियम सेवा महिन्याभरासाठी मोफत देत असल्याची घोषणा केली. यामुळे साईटवर येणाऱ्या युझर्सच्या संख्येत वाढ झाली आहे.

नक्की वाचा >> गाडीमध्ये सेक्स करताना आढळलं जोडपं, करोनासंदर्भातील सरकारी आदेश मोडल्याप्रकरणी कारवाई

२५ मार्च रोजी कंपनीने जगभरामध्ये मोफत सेवा देत असल्याची घोषणा केली. ही घोषणा झाली त्या दिवशीच वेबसाईटवर येणाऱ्या भारतीयांच्या संख्येमध्ये ५५.४ टक्क्यांनी वाढ झाल्याचे ‘मनी कंट्रोल’ने दिलेल्या वृत्तामध्ये म्हटलं आहे. या घोषणेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच २६ मार्च रोजी वेबसाईटवर येणाऱ्या भारतीयांची संख्या चक्क ८६.४ टक्क्यांनी वाढल्याचे आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे. तिसऱ्या दिवशी म्हणजेच २७ मार्च रोजी बेवसाईटवरील भारतीयांची संख्या २४ एप्रिलच्या तुलनेत जवळजवळ दुप्पट झाल्याचे पहायला मिळाले. २७ मार्च रोजी साईटवरील प्रिमियम कंटेंट पाहणाऱ्या भारतीयांची संख्या ९५.३ टक्क्यांनी वाढल्याचे पाहयला मिळाले. एक मार्च रोजी वेबसाईटवर केवळ ०.८ टक्के युझर्स हे भारतीय होते, असं आकडेवारी पहिल्यास दिसून येते.

इटलीबरोबरच फ्रान्स आणि स्पेनमध्येही कंपनीने सर्वात आधी मोफत सेवा देण्याचा निर्णय घेतला होता. करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने जास्तीत जास्त लोकांनी घरातच थांबावे आणि करोनाचा संसर्ग अधिक वाढू नये या हेतूने साईटवरील कंटेंट कंपनीने मोफत उपलब्ध करुन देत असल्याचे पत्रक जारी करण्यात आलं होतं.

नक्की वाचा >> Coronavirus: भारतामध्ये कंडोमचा खप प्रचंड वाढला; विक्रेतेही चक्रावले

आश्चर्याची बाब म्हणजे कंपनीने जारी केलेल्या अहवालामध्ये लोक वेबसाईटवर करोना किंवा कोवीड (‘Corona’ or ‘COVID’) या नावाने पॉर्न सर्च करत असल्याचे नमूद करण्यात आलं आहे. देशामध्ये पॉर्नहब आणि इतर पॉर्न वेबसाईटवर बंदी घालण्यात आली आहे. २०१८ मध्ये उत्तराखंड उच्च न्यायलयाने देशामध्ये ८२७ पॉर्न वेबसाईटवर बंदी घालण्याचे आदेश सरकारला दिले होते. या आदेशानुसार सरकारने २७ ऑक्टोबर २०१८ रोजी मोबाईल नेटवर्क आणि इंटरनेट सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांना ८२७ साईटवर बंदी घालण्याचे आदेश दिले होते. तेव्हापासून देशामध्ये या साईटवर बंदी घालण्यात आली आहे. मात्र असं असलं तरी देशामध्ये व्हिपीएनद्वारे (व्हर्चुअल प्रायवेट नेटवर्क) पॉर्न वेबसाइट्स पाहणाऱ्यांचे प्रमाणात तब्बल ४०० टक्क्यांनी वाढ झाल्याचे डिसेंबर २०१९ मध्ये समोर आलं होतं.

नक्की वाचा >> साथीचा असाही परिणाम; ‘हे’ Extra Marital App डाऊनलोड करणाऱ्या भारतीयांचे प्रमाण ७० टक्क्यांनी वाढले

पॉर्नहबच्या आकडेवारीनुसार भारतामधील ९१ टक्के युझर्स हे मोबाईलवरुन पॉर्न पाहत असल्याचे स्पष्ट होत आहे. कंपनीच्या या अहवालासंदर्भातील या आकडेवारीचा उल्लेख लाइव्ह मिंटच्या वृत्तामध्ये आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Coronavirus despite being blocked in india pornhub records 95 percent jump in indian users amid lockdown scsg
First published on: 07-04-2020 at 14:16 IST