करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जगभरातील अनेक देशामध्ये लॉकडाउन सुरु आहे. भारतामध्येही लॉकडाउन वाढवण्यात आल्याची घोषणा शुक्रवारी (१ मे २०२० रोजी) करण्यात आली आहे. त्यामुळे २५ मार्चपासून सुरु असणारा लॉकडाउनचा कालावधी १७ मे पर्यंत वाढवला आहे. भारताबरोबरच इतर देशांनाही वेळोवेळी लॉकडाउनचा कालावधी वाढवत नागरिकांच्या सुरक्षेला प्रथम प्राधान्य दिलं आहे. मात्र असं असतानाच काही देशांमध्ये करोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर तेथील एक एक सेवा हळू हळू सुरु करण्यात आली आहे. अपेक्षेप्रमाणे करोनानंतरचे जग हे वेगळं असेल याची झलक येथे पहायला मिळत आहे. सर्वात मोठा बदल हा हॉटेल्समध्ये झाला आहे. याचसंदर्भातील एक ट्विट आणि त्याला ज्या देशांमध्ये सेवा सुरु झाल्या आहेत तेथील लोकांनी दिलेले रिप्लाय सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

अमेरिकेमील मोमोफूकू या कंपनीचा मालक असणाऱ्या डेव्हिड चँगने एप्रिल महिन्यामध्ये एक ट्विट केलं होतं. यामध्ये त्याने ज्या देशामध्ये हळूहळू हॉटेल्स आणि  रेस्तराँ  सुरु झाली आहेत तेथील लोकांना कोणकोणत्या गोष्टीमध्ये बदल झाला आहे असं विचारलं आहे. “ताईपाई, हाँगकाँग, कोरिया, चीन मधील लोकं मला काही फोटो पाठवू शकतात का. तेथील बसवण्याच्या पद्धतीमध्ये काय बदल केले आहेत. सर्वांना मास्क आणि ग्लोव्ह सक्तीचे आङेत का?, कपड्यांबद्दल काही निर्बंध आहेत का? किचनमधील नियम बदलले आहेत का? तसे माझे काही मित्र आहेत या देशामध्ये मात्र मला अजून फोटो हवे आहेत. अगदी साध्या गाडीपासून ते आंतरराष्ट्रीय ब्रॅण्डच्या हॉटेलने काय बदल केले आहेत याबद्दलचे फोटो कोणी पाठवू शकेल का?”, अशी विचारणा करणारे दोन ट्विट चँगने केले होते.

चँगच्या या ट्विटला अनेकांनी प्रतिसाद देत तेथील हॉटेल्स आणि  रेस्तराँमध्ये करोनानंतर काय बदल करण्यात आले आहेत याची झकल दाखवणारे फोटो रिप्लायमध्ये ट्विट केले. पाहा काय आहे वेगवेगळ्या देशातील लोकांचे म्हणणे…

कमी टेबल, जास्त जागा आणि सॅनिटायझर

आधी सारखचं फक्त

रचना बदलली

काचा लावल्या

तापमान बघतात आणि मग एन्ट्री

पुठ्ठे, काचा अन् अंतर

टेक अवे

तैवान

तैवानमधील आणखीन एक हॉटेल

चीन

नियमावली

मास्क घातलेले वेटर

जपान

एकंदरीतच जगभरातील फोटो पाहता आपल्याकडेही हॉटेल, उपहागृहे आणि रेस्तराँमध्ये बरेच बदल दिसून येतील असंच सध्या म्हणता येईल.