महाराष्ट्रातील पोरं देशात करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे घरी असल्याचा फटका थेट फेसबुकचा संस्थापक असणाऱ्या मार्क झकरबर्गला बसला आहे असं तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल. मात्र तुम्ही मार्क झकरबर्गचा फेसबुकवरील फोटो पाहिल्यावर काय सांगतोय त्याचा अंदाज येईल. झालयं असं की मार्कच्या फोटोवर १ लाख ७८ हजार कमेंट आहेत. मात्र मागील काही दिवसांपासून मार्कच्या फोटोवर येणाऱ्या मराठी कमेंटमध्ये वाढ झाली आहे. त्याचं कारण म्हणजे महाराष्ट्रातील पोरं होम क्वारंटाइन आहेत आणि घरी वेळ जात नाही म्हणून त्यांनी फेसबुकवरील जुन्या फोटोंवर यमक जुळणाऱ्या कमेंट टाकण्यास सुरुवात केली आहे. या ट्रेण्डचा फटका मार्कलाही बसला आहे.

करोनाचा पार्दुर्भाव रोखण्यासाठी देशामध्ये २१ दिवसांच्या लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २४ मार्च रोजी ही घोषणा केली आहे. या घोषणेला आज (३१ मार्च रोजी) सात दिवस पूर्ण झाले आहेत. अजून दोन आठवडे देशामधील लॉकडाउन सुरु राहणार आहेत. या काळामध्ये अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व कंपन्या तसेच सार्वजनिक वाहतूक सेवा बंद राहणार आहेत. अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना घरुन काम करण्याची मुभा दिली आहे. शालेय तसेच महाविद्यालयीन परीक्षा पुढील सुचना मिळेपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यामुळेच आता अनेकजण घरीच होम क्वारंटाइन आहेत. अनेकांना या सक्तीच्या रजेमध्ये काय करावं हे सुचनेसं झालयं आहे. त्यामुळेच आता एक नवीन ट्रेण्ड फेसबुकवर पहायला मिळत आहे.

a young boy denied entry to bank of India branch for wearing shorts video goes viral
Nagpur Video: हा कोणता नियम! शॉर्ट पॅन्टमुळे बँकेत No Entry; नागपूरच्या तरुणाचा व्हिडीओ होतोय व्हायरल..
Nigerian citizen, Arrested in Nalasopara, Drugs Worth 57 Lakhs, cocaine, mephedrone, drugs in nalasopara, crime in nalasopara, marathi news, crime news,
नालासोपार्‍यात ५७ लाखांचे अमली पदार्थ जप्त
How to restrict WhatsApp media downloads
‘गुड मॉर्निंग’च्या फोटोने गॅलरी फुल? WhatsApp सेटिंगमधील ‘हा’ एक बदल करील तुम्हाला मदत; पाहा टिप्स….
Video Hardik Pandya Trolled Again For Praying At Gujarat Somnath Temple
Video: शेवटचा पर्याय ‘तोच’! हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सच्या सलग तीन पराभवानंतर पोहोचला गुजरातला अन्..

होम क्वारंटाइन असणाऱ्या अनेकांनी सोशल नेटवर्किंग साईट्सचा आणि वेब सिरीजचा आधार घेतला आहे. मात्र मागील सहा दिवसांमध्ये अनेकांच्या अनेक आवडत्या वेबसिरीज पाहून झाल्या आहेत. घरातून बाहेर पडणं शक्य नसल्याने आता अनेकांनी आपल्या मोर्चा टीकटॉकवरुन फेसबुकवर वळवला आहे. मिम्स शेअर करुनही कंटाळा आल्याने आता अनेकांनी आपल्या मित्र-मैत्रिणींनाच टार्गेट करण्यास सुरुवात केली आहे.

येथे क्लिक करुन वाचा काही व्हायरल झालेल्या मजेदार कमेंट

काय आहे हा ट्रेण्ड

मागील दोन दिवसांपासून फेसबुकवर एक ट्रेण्ड दिसून येत आहे. यामध्ये एकाद्या मित्राच्या किंवा मैत्रिणीचा काही वर्षांपूर्वीचा फोटो शोधून त्यावर यमक जुळवणाऱ्या भन्नाट कमेंट केल्या जात आहेत. भारतामध्ये फेसबुक मोठ्या प्रमाणत वापरण्यास सुरुवात होऊन दहा वर्षांचा कालावधी उलटला आहे. त्यामुळेच अगदी पाच वर्षांपासून ते आठ ते दहा वर्षांपूर्वीचे फोटो शोधून शोधून त्यावर अनेकजण कमेंट करत आहेत. त्यामुळे अनेकांचे जुने फोटो आता टाइमलाइनवर अचानक झळकू लागले आहेत. अचानक हे फोटो चर्चेत आल्याने ज्या मित्राला किंवा मैत्रिणींना टार्गेट केलं जात आहे ते लोकं हे फोटो डिलीट करत आहेत किंवा कमेंट डिसएबल करत आहेत. काहीजण या शेरेजाबीची मज्जा घेताना दिसत आहेत.

अनेकांनी मार्कच्या फोटोवरही मजेदार कमेंट केल्या आहेत.







या कमेंटमध्ये अनेकांनी असंच चालू राहिलं तर मार्क भारतीयांची आणि मराठी पोरांची फेसबुक अकाऊंट बंद करेल अशी वेगळीच भीती फोटोवर कमेंट करुन व्यक्त केली आहे.