करोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे जगभरात भीतीचे वातावरण आहे. लाखो लोकांना करोना व्हायरसचा फटका बसला आहे. प्रत्येक देश आपापल्या परीने या व्हायरसशी झुंज देत आहे. विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. करोनाचा फैलाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतात १४ एप्रिलपर्यंत लॉकडाउनची घोषणा केली आहे. त्यामुळे बहुतांश लोक हे घरातच आहेत. अशा परिस्थितीत ‘वर्क फ्रॉम होम’ ही सध्याची कामाची नियमित पद्धत झाली आहे. ‘सोशल डिस्टन्सिंग’ (Social Distancing) ही सध्या काळाची गरज असल्याने बहुतांश कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ची सुविधा देण्यात आली आहे.

किरण बेदींचे ट्विट पाहून नेटकऱ्यांनी दिला Whatsapp Uninstall करण्याचा सल्ला

मोठमोठ्या कंपनीतील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांपासून ते अगदी कारकून पदावरील काम करणारे कर्मचारी सारे वर्क फ्रॉम होम करण्याचे विविध उपाय शोधून काढत आहेत. अनेक लोक तर किती दिवसात फॉर्मल कपडे न घालता केवळ बर्मुडा, शॉर्ट्स किंवा लुंगी घालूनच काम करत आहेत. महिंद्रा ग्रुपचे अध्यक्ष आनंद महिंद्रा हे देखील अशा प्रकारे काम करतात. त्यांनी स्वत:च याबाबतचं खास गुपित साऱ्यांना सांगितलं आहे.

‘ढिंच्यॅक पूजाला तुझी जोडीदार बनव…’; युजवेंद्र चहलला चाहत्याची कोपरखळी

आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवर एक फोटो शेअर केला आहे. त्यात ‘वर्क फ्रॉम होम’ करणारा एक कर्मचारी लुंगीवर काम करत आहे. याच फोटोचा आधार घेऊन महिंद्रा यांनी एक गुपित साऱ्यांशी शेअर केलं आहे. “एक मजेदार फोटो माझ्या व्हॉट्सअपवर आला आहे. हा फोटो पाहून मला एक कबुली द्यावीशी वाटते आहे. मी जेव्हा घरात असतो, तेव्हा व्हिडीओ कॉलवर बोलताना बऱ्याचदा मी लुंगी आणि वर शर्ट घातलेला असतो. मला मिटिंग सुरू असताना उभं राहायचं नसतं, त्यामुळे तसं करणं चालून जातं. पण आता मला भीती आहे की कदाचित पुढच्या वेळेपासून मला माझे सहकारी व्हिडीओ कॉलदरम्यान उभं राहायला सांगतील”, असे ट्विट महिंद्रा यांनी केले.

आनंद महिंद्रा यांच्या या साधेपणामुळे त्यांनी पुन्हा एकदा नेटिझन्सची मनं जिंकली आहेत.