करोनाच्या पार्श्वभूमीवर देशामध्ये २५ मार्चपासून लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. मागील दीड महिन्यापासून देशातील सर्वाजनिक वाहतूक व्यवस्था बंद असून काही अपवाद वगळता रेल्वे वाहतूक तसेच हवाई वाहतूकही बंद आहे. कोरनाचा संसर्ग टाळण्यासाठी तीन टप्प्यांमध्ये लॉकडाउनची घोषणा करण्यात आली. पहिला लॉकडाउन हा १४ एप्रिल रोजी संपला त्याच दिवशी दुसऱ्या लॉकडाउनची घोषणा झाली जो ३ मेला संपला. मात्र त्याआधीच एक मे रोजी तिसऱ्या लॉकडाउनची घोषणा करत हा कालावधी आता १७ मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. दरम्यानच्या काळामध्ये अनेक कंपन्या बंद असून आयटी कंपनीतील कर्मचाऱ्यांना घरुन काम करण्यास सांगण्यात आलं आहे. तर काहीजण नाइलाजास्तव सुट्टीवर आहेत.

एकीकडे वाढलेल्या लॉकडाउनमुळे कुटुंबातील सर्व सदस्य घरीच असल्याने महिलांवर कामाचा ताण पडत असल्याचे सांगितले जात असतानाच दुसरीकडे मात्र काही पुरुषांनी किचनचा मार्ग निवडला आहे. अनेक पुरुष लॉकडाउनच्या कालावधीमध्ये किचनमध्ये आपली स्वयंपाकाची हौस पुरी करताना दिसत आहेत. ट्विटवरनेही अशा हौशी स्वयंपाक्यांना प्रोत्साहन देण्यासाठी #BeTheREALMAN आणि #LetMenCook हे हॅशटॅग प्रमोट केले आहेत. याच माध्यमातून पुरुष त्यांनी केलेल्या वेगवेगळ्या खाद्य पदार्थांचे फोटो आणि रेसिपी ट्विपल्सबरोबर शेअर करत आहेत. पाहुयात असेच काही घरातील हौसी आचारी आणि त्यांनी बनवलेल्या रेसेपी…

चला पोळी बनवायला तरी शिकलो

नवरा माझा गुणाचा

बायकोला बेस्ट बर्थ डे गिफ्ट

मी केलेलं जेवण

काहीतरी केलं मी

या ढोकळा खायला

सामान्य नाही तर अनेक दाक्षिणात्य अभिनेत्यांनाही किचनमध्ये जाऊन जेवण बनवण्याचा मोह आवरला नाही. चिरंजीवी, राम चरण, व्यंकटेश डग्गुबती यासारख्या कलाकारांनीही पाककलेमध्ये आपण किती पाण्यात आहोत हे या क्वारंटाइनदरम्यान तपासून पाहिलं आहे. त्यांनाही याबद्दलचे ट्विट केले आहेत. केवळ ट्विट करुन ते थांबले नाही तर त्यांनी आपल्या मित्रांना टॅग करुन जेवण करुन दाखवण्याचं आव्हानच केलं आहे. तुम्हीच पाहा काय म्हणतायत ते…

श्री श्री रविशंकर यांनी ट्विटवरुन पुरुषांनी जेवण बनवण्याचा प्रयत्न करावा असं म्हणत या गोष्टीला लॉकडाउन अॅडव्हेंचर असं म्हटलं आहे.

वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या सेलिब्रिटी शेफनेही ट्विट करुन घरामध्येच काय प्रयोग केले आहेत हे चाहत्यांना सांगितलं आहे.

तरुणांचा लाडका अभिनेता कार्तिक आर्यन यानेही किचनमध्ये आपला हात आजमावला आहे. त्यानेही यासंदर्भात ट्विट केलं आहे.

तुम्ही या लॉकडाउनच्या काळात घरी कोणती रेसिपी ट्राय केली हे कमेंट करुन नक्की कळवा