21 January 2021

News Flash

करोनाच्या त्या Caller Tune मागे आहे ‘या’ तरुणीचा आवाज, खूपच रंजक आहे किस्सा

Corona Caller Tune मुळे देशभरात प्रसिद्ध झाली आहे ही तरुणी

(Photo Courtesy: Instagram)

‘करोना वायरस या कोविड-19 (Covid 19) से आज पूरा देश लड़ रहा है. मगर, याद रहे हमें बीमारी से लड़ना है, बीमार से नहीं. उनसे भेदभाव न करें’… हे वाचताच तुम्हाला फोन लावल्यावर ऐकू येणारी कॉलर ट्यून आठवली असेल ना…कॉलर ट्यूनमधील हा आवाज आता प्रत्येकालाच ओळखीचा झाला आहे. पण हा आवाज कोणाचा आहे हे तुम्हाला माहिती नसेल. तर हा आवाज आहे वॉइस ओवर आर्टिस्ट जसलीन भल्ला हिचा. जसलीन भल्ला वॉइस ओवर आर्टिस्ट होण्याआधी एका वृत्तवाहिनीत स्पोर्ट्स पत्रकार होती. पण गेल्या १० वर्षांपासून ती फक्त वॉइस आर्टिस्ट म्हणून काम करत होती.

जसलीनच्या या आवाजामागे एक रंजक किस्सा आहे. जसलीन सांगते की, “आपला आवाज एक दिवस संपूर्ण देश ऐकेल याची आपल्याला अजिबात कल्पना नव्हती. एक दिवस अचानक मला हा मेसेज रेकॉर्ड करण्यास सांगण्यात आलं. आरोग्य मंत्रालयाकडून हा मेसेज आला असून ३० सेकंदाची मर्यादा असल्याचं मला सांगितलं. मी रेकॉर्ड केलं, पण याचं पुढे काय होणार आहे याची मला अजिबात कल्पना नव्हती. नंतर मला अचानक माझे मित्र, नातेवाईक यांचे फोन येऊ लागले. त्यांनीच मला कॉलर ट्यूनसंबंधी सांगितलं”.

जसलीनने हा मेसेज फक्त हिंदी नाही तर इतर भाषांमध्येही रेकॉर्ड करण्यात आला आहे. जसलीन एक प्रसिद्ध वॉइस ओव्हर आर्टिस्ट असून तिने अनेक जाहिरातींसाठी आवाज दिला आहे. याआधी डोकोमो, हॉर्लिक्स आणि स्लाइस मँगो सारख्या जाहिरातींसाठी तिने काम केलं आहे. अनेकदा आपला आवाज ऐकणं विचित्र वाटतं असं जसलीन सांगते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 10, 2020 11:47 am

Web Title: coronavirus lockdown jasleen bhalla is the voice behind covid 19 caller tune sgy 87
टॅग Coronavirus
Next Stories
1 Viral Video: उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये माकड आले आणि…
2 पाकिस्तानमध्ये जुगार खेळल्याच्या आरोपावरुन चक्क गाढवाला अटक, नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
3 ‘ओरीओ भजी’ पाहून नेटकऱ्यांमध्ये संतापाची लाट; म्हणे, ‘असे पदार्थ बनवणाऱ्यांवर कारवाई करा’
Just Now!
X